दिनांक ३० जुन २५, श्रीगोंदा::

शिरूर तालुक्यातील संविदणे येथे २७ जानेवारी २०२५ रोजी वृद्ध महिला वस्त्सलाबाई सुके यांच्याकडून अज्ञात चोरट्यांनी १.१० लाखांचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले होते.

शिरूर पोलिसांनी केवळ काही दिवसांत आरोपी अनिल सोमनाथ गव्हाणे आणि अनिल नारायण गव्हाणे (दोघे रा. श्रीगोंदा) यांना अटक करत चोरी गेलेले मंगळसूत्र हस्तगत केले.

तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे आणि बापू मांगडे यांचे मोलाचे योगदान लाभले.

दिनांक ३० जून २०२५ रोजी न्यायालयाच्या आदेशाने मंगळसूत्र परत करण्यात आले. या कामगिरीबद्दल शिरूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise…
