महामानव बाबा आमटे संस्थेच्या वसतिगृहात कायदु उर्फ मानसी सगड्या काळे ही विद्यार्थिनीने १ली ला प्रवेश घेतला.. मानसी तिच्या कुटूंबात चार पिढ्यात मुलींमध्ये शाळेत जाणारी पहिली मुलगी.. आई वडील पारधी समाजातील शिक्षण काय असते याची त्यांना माहिती नाही. सुनीता अडाणी सगड्या म्हणजे रोजंदारी ने काम करणारा..
कायदु खूप अल्लड होती. ती प्रथमता घरून आली तेव्हा तिला शाळेत घालताना रंग रूप बदलून शाळेत घालावे लागले होते. शाळेत जात असताना अनेक वेळा डब्बा दिला. कपडे दिले. पण, ती एका दिवसात गायब करायची. लहान असताना तिला मी अनेक वेळा चौकात आंघोळ घातली. तो दिवस आज आठवतो. कायदु बोलली सर माझे नाव कायदु आहे. सर्व लोक चिडवतात माझं नाव बदला. तिला विचारलं काय नाव ठेवू तू सांग ते नाव ठेवतो. तिने मला सांगितले मानसी ठेवा आणि कायदुचे नाव मानसी ठेवले.
३४ मुलांचे कुटूंबाला ३ गुंठयाच्या कुलकर्णी वाड्यात संस्थेचे कार्य सुरू होते. धड संडास, बाथरूम माहीत नाही. अशी सुरुवात होती. पारधी कुटूंबातील ही मुले आनंदाने संस्थेत राहायची.
कायदु १ ली ते ५ वी पर्यंत श्रीगोंदयाला राहिली. पुढे थोडी मोठी झाली. मंग तिला अहमदनगर स्नेहालयात पाठवले. आदिवासी पारधी कुटूंबातली श्रीगोंदा, कोळगाव, पंचक्रोशी परिसरात पारधी समाजातली १० वी पास होणारी ही पहिलीच मुलगी असावी.
मानसी पास झाली…४१,% टक्के कमी पडले असले, तरी जिद्दीने ती शिकली. तिच्या बरोबर आलेल्या काही मुली भटकंती मध्ये बाहेर गेल्या आणि त्यांची आई बापानी लग्न लावली..
सुनीता आणि सगड्याचे आभार त्यांनी तिला शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले.. मानसी शिक्षणाच्या प्रवाहात टिकली.. पुढे तिला नर्सिंगला जायचे आहे. एकदा तीने मला बोलताना सांगितले.. आजही मानसीचे तीन लहान भाऊ महामानव बाबा आमटे संस्थेत निवासी शिक्षण घेत आहेत.
स्नेहालय परिवाराचे हार्दीक कृतज्ञता.. स्नेहालय ने मानसीची शिक्षणाची जबादारी स्विकारली.. स्नेहालय झाली माता..
स्त्रोत:(अनंत झेंडे,महामानव बाबा आमटे सेवा संस्था श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर.मो. ९४०४९७६८३३..)
