कर्जाचा डोंगर अन फिनिक्स भरारी…

वडील परागंदा झाले. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. गळ्याभोवती आत्महत्येचा फास आवळावा असा विचार डोक्यात गरगरत होता. मात्र, कुटुंब डोळ्यासमोर उभे राहत होते. अशा परिस्थीत मी व बंधू संदीपने जीवनात लढाई करण्याचा निर्णय घेतला आणि मजूर म्हणून वाळू उपसन्यासाठी नदी गाठली. अशा परिस्थीत मित्रांच्या सहकार्याने कलिंगड, खरबूज, डाळिंब खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला वादळात सापडलेल्या प्रपंचाला आधार मिळू लागला. आणि १२ वर्षात जीवनात यशाचे किरण आले. अशी माहिती काष्टी येथील अनिल शिवराम शेलार यांनी दिली.

जीवनातील चढ उतारांचे पैलू उलगडताना शेलार म्हणाले की, शिवराम (वडील), दौपदा (आई) सुनंदा (पत्नी) प्रज्ञा, प्रतिक (मुले) असे आमचे छोटेसे कुटुंब सन २००४ मध्ये वडील घरातून परागंदा झाले. प्रपंच आर्थिक अडचणीत सापडला. २० लाखाची जमिन आणि ३५ लाखाचे कर्ज अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या बळावर जीवनात संघर्ष करण्याची तयारी केली. कष्ट आणि वेदनांची जाणीव झाली. आबासाहेब कोल्हटकर, बापूसाहेब खरात यांची साथ मिळाली. सुरवातील वाट्याने जमिनी करण्यास सुरूवात केली. संदीप एम.एससी. अभियंता झाला आणि बहिण मंदाकिनी आयटी इंजिनियर झाली. कुटुंबाला शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंबाला प्रतिष्ठा आणि समृद्धीचे मार्ग खुलू लागले . मी मात्र १० वी पास ही मनात कायम खंत आहे.

कंलिगड, डाळिंब, खरबूज विक्रितून व्यापाऱ्यांशी मैत्रीचे संबंध आले आणि या संबंधातून सन २०१२ मध्ये काष्टीत ओम साई ॲग्रो नावाने कृषीसेवा केंद्र सुरू नवनाथ रसाळ, बंटी पाचपुते, भैय्या पाचपुते, चंद्रशेखर मोरे, जिजाबापू रोडे, यांची साथ मिळाल्याने व्यवसायातून अर्थकारणाला नवी दिशा मिळाली. बंधू संदीपने पुण्यात ट्रेडिंचे व्यवसाय सुरू केला. बहिण मंदाकिनी हीला आयटी इंजिनियर म्हणून अमेरिकेत जॉब मिळाला. अशा परिस्थितीत आपण सुमार १००० शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून कृषी व्यवसाय स्थिरावला आहे. निहाल शेख यांची व्यवसायात चांगली साथ मिळत आहे. या व्यवसायातून शिरूर, श्रीगोंदा, दौंड शेतकऱ्यांशी वेगळे संबंध प्रस्तापित केले. झाले आहे. ही समाधानाची बाब आहे.

वडील ज्यावेळी परागंदा झाले आणि कठिण परिस्थीती आली या परिस्थितीतून बरेच काही शिकण्यास मिळालं. आणि मित्र, नातेवाईकांच्या मदतीने घसरलेली गाडी पुन्हा धावू लागली आहे..

संदेश

आता पारंपारिक शेती करण्याचे दिवस संपले असून तरूण मुलांनी जादा शेती करण्यापेक्षा पॉलीहाऊसची शेती करणे संकल्प करणे आवश्यक आहे. अनिल शेलार, काष्टी

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)प्रस्तुत माहिती (कृषीभूषण) पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

आज ‘कृषीभूषण’ या अग्नीपंख ने रचलेल्या यशोगाथांचा शेवटचा भाग संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading