परिक्रमा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील कु. शैला तांदुळकर रांगोळी स्पर्धेत प्रथम

दिनांक,१९ मे(काष्टी श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महा विद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी कु. शैला तांदुळकर हिने पदमश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना ली., प्रवरानगर आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली. तीला प्रा. वैशाली फाळके यांचे मार्गदर्शन मिळाले.


कोविद १९ साथीच्या च्या लॉकडाउन मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा वक्तिमत्व विकास व्हावा तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परिक्रमा सतत प्रयत्नशील असते. यशस्वी विद्यार्थिनीचे परिक्रमा संकुलाचे सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते व संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading