नपा. प्रभाग ४, श्रीगोंदा: सौ. आरती कुणाल शिरवाळे ‘प्रथम पसंतीच्या’ उमेदवार.! उच्चशिक्षित, बचत गट उपाध्यक्षा शिरवाळे यांचे महिला सशक्तीकरण व मूलभूत सुविधांवर लक्ष..

श्रीगोंदा: दिनांक १४ नोव्हेंबर २०२५

श्रीगोंदा येथील प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी सौ. आरती कुणाल शिरवाळे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून, त्या या प्रभागातील सर्वात सर्वोत्तम नेतृत्व असलेल्या उच्चशिक्षित महिला म्हणून ओळखल्या जात आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या.

सौ. शिरवाळे या विविध विषयांच्या तज्ज्ञ असून महिलांच्या प्रश्नांसाठी त्या सक्रिय असतात. सामाजिक आंदोलने, महिला अत्याचारांच्या घटना आणि महिलांच्या न्यायिक भूमिकेसाठी त्या सहभागी होऊन पुढाकार घेतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या एल.एल.एफ. आणि एल.एफ. या संघटनांच्या तालुक्यातील सर्व बचत गटाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी सुमारे दोन कोटींच्या आसपास कर्जवाटप करून महिला सशक्तीकरणासाठी मोठे योगदान दिले आहे.

प्रभाग विकास आणि मूलभूत सुविधांवर भर देत त्यांनी पुढील योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगितले:

औटीवाडी परिसरात प्रधानमंत्री आवास, रमाई आणि इंदिरा आवास योजना प्रभावीपणे राबवणे..  वाडी वस्त्यांवरील रस्ते, गटार व्यवस्थापन, दिव्यांचा प्रश्न, सांडपाणी नियोजन आणि गटर लाईनचे काम मार्गी लावणे.

प्रभागातील (सिद्धार्थ नगर, ससाणे नगर, औटीवाडी) तरुणांसाठी रोजगार निर्मिती, आरोग्य आणि साफसफाई कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आरोग्य प्रश्नांसंदर्भात उपाययोजना आणि सुरक्षा किटचा पाठपुरावा… औटीवाडी समाज मंदिर, घरकुल, स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण आणि दशक्रिया विधीसाठी ठिकाण निश्चित करणे.

सार्वत्रिक ठिकाणी ब्लॉक तसेच प्रत्येक मागासवर्गीय आणि सामान्य नागरिकाच्या दारासमोर सौरदिवे बसवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

सौ. आरती कुणाल शिरवाळे यांनी सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून समाज हिताची आणि मूलभूत विकासाची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. जनतेतून प्रथम पसंती असल्याने नव्याने संधी द्यावी, जेणेकरून संधीचे सोने करणार, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले आहे. त्यांची प्रभागातून प्रथम पसंतीच्या उमेदवार म्हणून सर्वत्र चर्चा आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती आणि चर्चा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading