दिनांक ३ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील रयतच्या संकुलातील महादजी शिंदे विद्यालय रिक्त असणार्या प्राचार्य पदाचा कार्यभार नवनाथ बोडखे यांनी स्वीकारला. यावेळी बोलताना ते म्हणाले, रयत शिक्षण संस्थेमध्ये महादजी शिंदे विद्यालय हे अत्यंत गुणवान व वैभवपूर्ण विद्यालय आहे. विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा या क्षेत्रांमध्ये विद्यालयाने नाविन्यपूर्ण ठसा उमटवला आहे.

अशा या विद्यालयाच्या विविधांगी प्रगती घडवून आणण्यासाठी व विद्यालयाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, रविशेठ दंडनाईक, प्रा.तुकाराम दरेकर, उत्तर विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे, स्थानिक पालक सर्वांचे मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे.
सध्या कोरोना सारख्या जागतिक महामारीचा कालखंड चालू असूनही विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या समन्वयाने सर्व प्रकारची काळजी घेऊन विद्यालय सुरू आहे. याबाबत त्यांनी प्रभारी प्राचार्य बाळासाहेब जाधव व पर्यवेक्षक उत्तम बुधवंत यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी कन्या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या ज्योत्स्ना भंडारी व प्राचार्या वंदना नगरे, उपप्राचार्य सौ. चौधरी, दिलीप भुजबळ, राजेंद्र खेडकर, वसंत दरेकर, सुनील दरेकर, शहाजी एकाड तसेच महादजी शिंदे विद्यालयाचा सर्व सेवक वृंद यांच्या वतीने प्राचार्य नवनाथ बोडखे यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक विलास दरेकर, सुत्रसंचालन विलास लबडे, आभार प्रदर्शन सुधाकर जानराव यांनी केले.
स्रोत:(सचिन झगडे,सर)
