पाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडे तीन कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणार     – माजी मंत्री पाचपुते …                            वडगाव शिंदोडी येथील बैठकीत निर्णय

श्रीगोंदा दिनांक १३ ऑक्टोबर :

घोड धरणात संपादीत झालेले वडगांव शिंदोडी, म्हसे, माठ राजापूर, दाणेवाडी या पाच गावांच्या पुनवर्सन झालेले नाही. या पाच गावांच्या जमिनी, गावठाण घोड धरणाच्या पाण्यामध्ये गेल्यामुळे सदर गावे प्रकल्प बाधित झालेली होती. या गावांचे शासनाने अजूनही पुनर्वसन केलेले नाही. मा.आयुक्तांकडून आलेल्या ३ कोटी ५६ लक्ष रुपयांचा प्रस्ताव तयार करून  पुनवर्सन नियमांतर्गत ज्या नागरी सुविधा देण्याच्या आहेत, याबाबत चर्चा होऊन सदर प्रस्ताव शासनांकडे मंजुरीसाठी पाठविणेचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाचपुते यांनी पुढे म्हटले आहे की, “घोड धरणांच्या प्रकल्पामध्ये संपादीत गावांच्या पुनवर्सना संदर्भात मौजे वडगाव शिंदोडी येथे वडगाव शिंदोडी, म्हसे, माठ राजापूर, दाणेवाडी या पाच गावांच्या पुनवर्सनासाठी  बैठक  झाली. सदर बैठकीस उपजिल्हा अधिकारी श्री.भानुदास पालवे, जिल्हा पुनवर्सन अधिकारी ज्योती कावरे, पुनर्वसन विभागाचे तहसीलदार श्री.राजेंद्र थोटे, श्रीगोंद्याचे तहसिलदार श्री.महेंद्र माळी तसेच  पाटबंधारे विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात शासनांकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर त्यास मंजुरी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे.” असा दावा ही पाचपुतेनी केला. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नागवडे, संतोष पवार, मिट्टूभाई शेख, ईश्वरे गुरुजी, रेवजी घेगडे, गंगाधर घेगडे, रामदास भोसले इ.कार्यकर्त्यांसह वडगाव शिंदोडी, म्हसे माठ दाणेवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.  

 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading