स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीकडून उपस्थितांना covid-19 चे समुपदेशन करून,मास्कचे वाटप..

दिनांक १६ ऑगस्ट..(पिसोरेखांड,श्रीगोंदा):

तालुक्‍यातील पिसोरेखांड येथील रहिवासी असलेली उच्चशिक्षित महाविद्यालयीन विद्यार्थिनी सह्याद्री ओहोळ हिने सामाजिक भूमिकेतून येथे साजरा झालेल्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थितांना कोरोना विषाणू प्रादुर्भाव संदर्भात जागृती विषयी माहिती देऊन मास्कचे वाटप केले.

७४ व्या स्वातंत्र्यदिनी ग्राम पंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना सह्याद्रीने सामाजिक अंतर तसेच covid-19 च्या संदर्भात मार्गदर्शन करीत साधारण अडीजशे मास्कचे वाटप केले आहे. सह्याद्री ही विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी आहे.

स्रोत:(सुनिल ओहोळ यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading