कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रात, शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी नगरपरिषदेला ब्रिगेडचे ऑनलाइन निवेदन..

दिनांक २३ जून,श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपरिषद पाणीपुरवठा केंद्र आनंदकर मळा या ठिकाणावरून जे पाणी श्रीगोंदा वासियांना पिण्यासाठी मिळत आहे. ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे. असे पत्र मिळण्याबाबत संभाजी ब्रिगेड साळवनदेवी रोड शाखा येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन पत्राद्वारे नगरपालिकेला मागणी केलेली आहे.

या ठिकाणचे कार्यकर्त्यनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फोन करून रितसर परवानगीसाठी मागणी केली असता, पोलीस स्टेशने तुम्ही कुठेही न जाता व्हाट्सअप द्वारे हे निवेदन पालिकेला देऊ शकता अशी माहिती दिल्यानंतर येथील कार्यकर्त्यांनी ऑनलाईन निवेदन पाठवले आहे.

यामध्ये प्रामुख्याने नानासाहेब शिंदे (तालुका कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड), (शाखा अध्यक्ष) प्रवीण धुमाळ, (शाखा उपाध्यक्ष) मयूर आढाव, (शाखा सचिव) विनोदजी कोथिंबीरे यामध्ये या सर्वांनी पुढाकार घेऊन शुद्ध पाणी शहराला कसे मिळेल, यासाठी नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे. या परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. घरोघरी जारचे पाणी देणे शक्‍य नसल्याने, नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याची विनंती या निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या  पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading