दिनांक २३ जून,श्रीगोंदा:
स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने राज्यातून पुणे – मुंबई किंवा राज्याच्या विविध शहरी भागात गेलेल्या विद्यार्थ्यांवर कोरोना प्रादुर्भाव काळामध्ये राहण्यासह उपजीविके संदर्भात अन्याय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोना संक्रमना दरम्यान वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांना घर भाड्याचे कारण दाखवून घरातून बाहेर काढण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे.
याविषयी श्रीगोंदा तालुक्यातील ऋषिकेश गोरे या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांने नमूद विषया संदर्भात मुख्यमंत्र्यानां विनंती केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थी परीक्षा अध्ययनासाठी शहरात आहेत. कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर लोकांनी स्थलांतर केले आहे. शासनाने निर्देश देऊनही लोक घरभाडे मागत आहेत. अश्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अश्या कालखंडात विद्यार्थ्यांना अभ्यासाला मोकळीक मिळावी यासाठी, शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे संबंधित घरमालकांनी भाडे घेऊ नये किंवा सोयीनुसार घ्यावे असे असतांनाहि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे गोरे यांनी लक्ष वेधले आहे.
त्यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे की, पुण्यात घरमालकांची विद्यार्थ्यावर दबाव आणून घरभाडे मागणी चालू आहे आणि कालच यांचा प्रत्यय म्हणून कर्वेनगर येथील स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांचं सामान, पुस्तक रूम बाहेर फेकून देण्यात आले आहे. सदर माहिती वरून शासनाने तातडीने एक पत्रक काढून त्यात काही बाबी समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे.
कोणत्या ही जिल्हातील घरमालकाने विद्यार्थ्यांकडे मागील तीन चार महिन्याचं घरभाडे तात्काळ वसूल करू नये अश्या बाबी आढळून आल्यास त्या घरमालकावर योग्य ती कारवाई केली जावी, स्पर्धा परिक्षाच्या तारखा जाहिर झाला आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थी पुण्यात किंवा इतर जिल्हात पुन्हा अभ्यासासाठी येतील त्यांच्यावर लगेच कोणी घरभाड्याचा तगादा लावू नये. कारण हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील मुलं मुली आहेत, या बाबी लक्षात घेऊन विद्यार्थी आहे त्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन सर्व सोडून गावी गेले आहेत, त्यातून त्याना गावी राहून अनेक अडचणींना सामोर जावं लागतं आहे. त्यामुळे आपणचं या मुलाच्या मागे उभं राहणे गरजेचं आहे.अश्या पद्धतीने ऋषिकेश बाळासाहेब गोरे यांनी शासनाला नमूद प्रकार लक्षात आणून देत त्यात सुधारणा करण्याची मागणी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.
(स्त्रोत:ऋषिकेश गोरे यांचे प्रसिद्धी पत्र.)
