श्रीगोंद्यातील पै.धनश्री फंड थायलंड येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार..

दिनांक २७ जुन २०२४,श्रीगोंदा:

१६ ते २२ जुलै २०२४ दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती (५५ किलोग्रॅम) स्पर्धेसाठी २० वर्षाखालील वयोगटात महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या पै. धनश्री फंड हिची भारतीय संघात निवड झाली आहे.

इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे प्रमुख हनुमंत फंड यांच्या दोन्ही कन्या पै. धनश्री फंड आणि पै. भाग्यश्री फंड ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतात. श्रीगोंदा तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

पै. धनश्री फंडची मोठी बहीण पै. भाग्यश्री फंड हिने दोन वेळा महिला महाराष्ट्र केसरी बहुमान प्राप्त केला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कुस्तीगीर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यासाठी हा महिला कुस्तीचा सुवर्णकाळच आहे.

पै. धनश्री फंडच्या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल दादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य प्रो. डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल, श्री. हनुमंत फंड, सौ. पूजा फंड व श्री. प्रतीक सातव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading