श्रीगोंदा येथील सावंत वस्तीवर राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी..

दिनांक २६ जुन २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरानजीक पेडगाव रस्त्यावरील सावंत वस्ती येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच, विद्यार्थी आणि बहुजनांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे परिवर्तनवादी व शैक्षणिक विचार समजावण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अजित खरसडे होते आणि प्रमुख व्याख्याते म्हणून उबाळे सर, कृषी तज्ञ रणवरे सुरेश शेठ, समीर शिंदे, सुभाष बोराडे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचितांचे नेते संजय सावंत यांनी केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक खरसडे म्हणाले, “कोल्हापूर संस्थानांमध्ये शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करताना पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्यांनी पाठवले नाही त्यांना एक रुपयाचा दंड लावला जात असे. परंतु सध्याच्या प्राथमिक शिक्षणाची स्थिती भयावह आहे आणि शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमात श्रीगोंदा येथील उद्योजक सुदाम शेठ कोथिंबीर, विठ्ठल शिंदे सर, विजय गायकवाड सर, किरण शिंदे साहेब तसेच सावंत वस्तीवरील सर्वच लहान, थोर मंडळी उपस्थित होती.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading