भारत सर्व सेवा संघ, पाचेगावच्या अध्यक्षपदी राजेंद्र नलगे आणि सचिवपदी प्रकाश जाधव यांची फेरनिवड..

दिनांक २६ जुन २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:

भारत सर्व सेवा संघ, पाचेगावच्या अध्यक्षपदी कोळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सर्वज्ञ मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र नलगे आणि सचिवपदी प्रकाश जाधव यांची फेरनिवड झाली आहे. या शैक्षणिक संस्थेच्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात एकूण सोळा शाखा आहेत.

भारत सर्व सेवा संघाच्या वार्षिक सभेचा कार्यक्रम दिनांक २५ जून रोजी पाचेगाव इंग्लिश स्कूल, पाचेगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या सभेमध्ये पुढील पंचवार्षिक कालावधी (२०२४ ते २०२९) साठी अध्यक्षपदी राजेंद्र नलगे आणि सचिवपदी प्रकाश जाधव यांची सलग दहाव्यांदा निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी भिकाजी जंगले आणि खजिनदारपदी हनुमंत पाटील यांची निवड झाली. अध्यक्ष आणि सचिव पदाच्या सूचनांची मांडणी संस्थेचे संचालक अशोक तुवर यांनी केली आणि अनुमोदन संचालिका अलका पाटील यांनी दिले. या वेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते आणि त्यांनी एकमुखाने सहमती दर्शविली.

राजेंद्र नलगे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे आणि निर्णय क्षमतेमुळे संस्थेच्या शाखांच्या विकासात शैक्षणिक, गुणात्मक, आणि संख्यात्मक वाढ झाली आहे. संस्थेच्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये १२ माध्यमिक विद्यालये, ३ जुनियर कॉलेज, आणि एक वसतीगृह आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे संस्थेच्या शाखांमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत.

या फेरनिवडीबद्दल श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सरपंच पुरुषोत्तम लगड, कुकडी कारखान्याचे संचालक सुभाष लगड, मच्छिंद्र नलगे, विश्वास थोरात, मार्केट कमिटीचे संचालक नितीन डुबल, ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे, चिमणराव बाराहाते, संकेत नलगे, नारायण जठार, चेतन जठार, रोहन नलगे, शलाका नलगे, अमोद नलगे, नितीन नलगे, उल्हास नलगे, मधुकर लगड, शिवराज देशमुख, अनिल नलगे, गोरख धोंडगे, सुयश जाधव आणि भारत सर्व सेवा संघाचे सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्वज्ञ मल्टीस्टेटचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading