दिनांक २६ जुन २०२४, श्रीगोंदा:
सोमवार, दिनांक १ जुलै २०२४ रोजी अहिल्या नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा श्रीगोंदा इंडिया आघाडीच्या वतीने श्रीगोंदा शहरातील तुळशीदास मंगल कार्यालय येथे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्यासाठी इंडिया आघाडीचे श्रीगोंदा तालुक्याचे प्रमुख नेते बाबासाहेब भोस, घनश्याम आण्णा शेलार, राहुल दादा जगताप, साजन भैय्या पाचपुते हे उपस्थित राहणार आहेत.
ही माहिती काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संजय आनंदकर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे, आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख विजय शेंडे, आपचे तालुकाध्यक्ष डॉ. अनिल कोकाटे,
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष कांतीलाल कोकाटे, माजी उपनगराध्यक्ष राजु गोरे, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या सत्कार सोहळ्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



