पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिदास (बाप्पू) झुंजार यांचे अल्पशा आजाराने निधन..

दिनांक २२ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिदास बाबासाहेब झुंजार उर्फ बाप्पू यांचे आज मेडिकेअर हॉस्पिटल, श्रीगोंदा येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ५७ वर्षांचे होते. त्यांना मागील चार महिन्यांपासून अर्धांगवायूचा त्रास होत होता आणि त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू होते.

रोहिदास झुंजार हे सेवेतून लवकरच निवृत्त होणार होते, परंतु त्यांच्या प्रकृतीच्या समस्या वाढत गेल्या. सुरुवातीला त्यांना अहमदनगर येथील न्यूरॉन प्लस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार झाले. अखेर त्यांच्यावर श्रीगोंदा येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, जिथे आज दुपारी ४:०० वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आणि तीन मुली असा कुटुंब आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंब आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

झुंजार बापू यांचा अंत्यविधी आज रात्री ८:३० वाजता त्यांच्या मूळगावी खांडवी, तालुका कर्जत येथील स्मशानभूमीत होणार आहे. बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांसह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे.

स्त्रोत: (सुजित रोहिदास झुंजार)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading