कृषीभूषण..
श्रीगोंदा – महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडले आणि शेती हाच आपला उद्योग माननारे आढळगाव येथील शेतकरी महेश बबनराव शिंदे यांनी आढळगाव शिवारात बारा एकर क्षेत्रात डाळिंबाची स्व : ताची बाग फुलविली. परिसरातील सुमारे ४०० शेतकऱ्यांना मोफत डाळिंबाचे उत्पादन कसे घेतले पाहिजे याचे धडे दिले त्यामुळे श्रीगोंद्याच्या पुर्व भागात डाळिंब शेतीचा सुंगध दरवळला आहे त्यामुळे महेश हे डाळींब शेतीचे सुपर स्पेशालिटी ठरले आहेत .
महेश शिंदे यांचे मुळगाव दौड तालुक्यातील राहू येथे बबनराव यांनी विजेच्या खांबाचे खड्डे खोदले आणि लाईनमन झाले. राहू परिसरात २२ एकर जमीन खरेदी केली महेश यांनी एफ.वाय.बी.ए. व उमेश यांनी नववीतून शाळा सोडली डाळिबाची शेती करण्याचा निर्णय घेतला एक्स्पोर्ट क्वालिटीची डाळिब तयार केले सन २००३ – २००९ दरम्यान शिंदे बंधूंची डाळिंब युरोप मध्ये एक्स्पोर्ट झाली. महेशराव यांना पत्नी मिनाक्षी यांची डाळिब शेतीत मोठी साथ लाभली प्रेरणा प्रज्वल या दोन मुली , सिध्देश हा मुलगा आहे .
महेश शिंदे यांनी मारुती शिंदे यांच्या मदतीने सन २०१० मध्ये आढळगाव शिवारात तांदळी रोडला साडे चौदा एकर जमीन खरेदी केली. आधुनिक तंत्रज्ञान व शेततळे केले आणि साडे बारा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली . तसेच राहू मध्ये तेरा एकरात डाळिंब शेती आहे आणि आता भावडी रोडला पंधरा एकर क्षेत्रात डाळिबाची लागवड केली आहे .
महेश शिंदे हे पुर्ण वेळ डाळिंब शेतीत लक्ष देतात त्यांचा डाळिंब शेतीत दांडगा अनुभव झाला आहे. डाळिब शेतीतून दरवर्षी सुमारे आडीच कोटीचे उत्पन्न घेणे त्यांचे उद्दिष्ट असते त्या दृष्टीकोनातून ते खत औषधे आणि पाण्याचे नियोजन करतात . आढळगाव परिसरातील पंधरा तरूणांना बारामाही रोजगारमुळे मिळाला आहे. महेश शिंदे डाळिब शेतीचे सुपरस्पेशीलिटी म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. महेश शिंदे यांनी स्व : ताची शेती करता करता आढळगाव कोकणगाव भावडी तांदळी पिसोरेखांड घोडेगाव हिरडगाव परिसरातील शेतकऱ्यांना डाळिब लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले सुमारे ४०० डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रूप तयार झाला आहे . डाळिब शेतीत अडचण आली कि परिसरातील शेतकरी महेश शिंदे यांच्याकडे सकाळी येतात शिंदे सकाळी दहा वाजेपर्यंत सल्ला देतात. नंतर मात्र ते कुणाला भेटत नाहीत आणि त्यांना ते मोफत सल्ला देतात त्यामुळे सुमारे दीड हजार एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड झाली आहे .
मी डाळिंब शेतीला उद्योग मानला आहे त्यामुळे या शेतीतील अनुभव आणि पैसा मिळाला आणि इतर शेतकऱ्यांना कोणतीही अपेक्षा न धरता सल्ला देण्याचे काम चालविले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना डाळिब शेतीचा लळा लागला आहे.यामधून अनेक मित्र तयार झाले आहेत. तेही डाळिब शेतीतुन उभे राहिले राष्ट्रीय उत्पादनात करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य लाभले याचे मनात मोठे समाधान आहे.
संदेश
डाळिब हे कमी पाण्यावर येणारे पिक आहे. शेतकरी झाडांकडे दुर्लक्ष करतात आणि बागेवर मर , तेल्या सारखे रोग ॲट्याक करतात. तेव्हा शेतकऱ्यांनी फळे तोडल्यानंतर झाडांना शेण खत व रासायनिक खतांचा डोस आणि फुल धारणेसाठी ३० % नैसर्गिक पध्दतीने ताण बसेल अशा पध्दतीने ताण दिलाच पाहिजे आणि डाळिंब शेतीसाठी स्व : ताचे कटर आणि इतर साधने हत्यारे वापरली पाहिजे यामध्ये डाळिंब शेतीतील यशाचे गुपीत दडलेले आहे.
महेश शिंदे,आढळगांव
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
