दिनांक ९ सप्टेंबर,श्रीगोंदा:
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील शेतकरी महिला विमलताई अनारसे यांची पहिल्यांदा प्रहार जनशक्ती पक्षाचे संथापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. त्या पदापासुन पक्षाचे संघटन व जनसेवेचा आलेख पाहुन राज्य मंत्री कडू यांनी अनारसे ताईंना प्रहार जन शक्ति पक्षाच्या महिला प्रदेशध्यक्ष व महासचिव पदाची नुकतीच जबाबदारी दिली आहे. तसे पत्रही देण्यात आले आहे.
अनारसेताईंना राज्यमंत्री बच्चु कडू, (राष्ट्रवादीचे आमदार) रोहित पवार, (प्रदेशध्यक्ष) अजय बारस्कर, (महाराष्ट्र उपध्यक्ष) संतोष पवार, (उत्तर जिल्हा अध्यक्ष) अभिजीत पोटे, (दक्षिण जिल्हा अध्यक्ष) विनोद परदेशी, (लोकनेते) राजेंद्र मस्के, अजित धस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तर, निवडीबद्दल श्रीगोंदा प्रहार संघटने मधील (दिव्यांग तालुकाध्यक्ष) राजेंद्र पोकळे, (जिल्हा संघटक) साहेबराव रासकर, (प्रथम शहरध्यक्ष) नितीन रोही, (जिल्हा उपाध्यक्ष) वामन भदे, (तालुकाध्यक्ष) कृष्णा खामकर, (सचिव) ज्ञानदेव भैलुमे, (शहराध्यक्ष) महादेव बनसोडे, हरिभाऊ खामकर, सुरेश गलांडे, गुरु गायकवाड, सुभाष गांजुरे, भागवत व्यवहारे, शरद वाणी, नितीन शेंडगे, विजय शेंडगे, आदेश शेंडगे यांनी सत्कार करीत पुढील वाटचाळीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(नितीन रोही यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
