दिनांक ९ सप्टेंबर, श्रीगोंदा:
“रोजगार दो” अभियानासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात, पवार मॅडम यांना तरुणांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) प्रशांत ओगले, (युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष) गोरख बायकर, (श्रीगोंदा शहराध्यक्ष) योगेश मेहेत्रे, (उपाध्यक्ष) सोमनाथ जगताप, विशाल दांडेकर, (सरचिटणीस) प्रशांत सिदनकर, (युवक नेते) संदीप वागसकर, निलेश उबाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आज संपूर्ण भारत देश करोना साथीच्या आजाराने ग्रासला आहे. त्याचबरोबर बेरोजगारी देखील वाढली आहे. नियोजनबद्ध लॉकडाऊनने संपूर्ण देशाचे भविष्य काळोखात ढकलले आहे. आजचे तरुण त्रस्त आणि बेरोजगार आहेत. ज्या देशाने जगाला सर्वोत्कृष्ट डॉक्टर, अभियंता, वैज्ञानिक दिले. आज तोच देश बेरोजगारीच्या कक्षेत आला आहे. त्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी सरकारला जाते. असे प्रतिपादन निवेदनात करण्यात आले आहे. प्रत्येक वेळी जीडीपी खाली येते आहे. हा केंद्र सरकारच्या नाकर्तेपनाचा एक पुरावा आहे. अनियोजित लॉकडाऊनमुळे आज १२ दशलक्ष लोक बेरोजगार झाले आहेत. त्याचप्रमाणे नोट बंदीच्या वेळी २ कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले होते. लोकडाऊनमध्ये बंद असलेले अनेक व्यवसाय पूर्ववत आणण्याची घोषणा करण्यात आलेल्या २० लाख कोटींचे पॅकेज, एक मोठी गंमत बनली आहे. असेही यात नमूद करण्यात आले आहे.
आज देशातील प्रत्येक तरुण काम करण्यास तयार आहे. परंतु, हे सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यास सक्षम आहे का? असा सवाल आंदोलन करणाऱ्या या तरुणांनी केला आहे. २०१४ मध्ये रोजगाराशी संबंधित मेनफेस्टोची आश्वासने फक्त कागदाचा तुकडा बनली असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
स्रोत:(योगेश म्हेत्रे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
