साबां उप विभागासह जलसंधारणाच्या निकृष्ट कामांबरोबर,शेतकरी पीक विमासंदर्भात २२ जून रोजी प्रहारचे श्रीगोंदयात आंदोलन..

दिनांक १८ जून,श्रीगोंदा:

प्रहार जनशक्ती पक्ष, श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने येत्या २२ जूनला आमरण उपोषण केले जाणार असल्याची माहिती आज सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली आहे.

तालुक्यातील ४५०० शेतकऱ्यांनी सन २०१९ मध्ये डाळीबांचा पिक विमा बजाज आलायन्स कंपनी यांचेकडे उतरवला होता. परंतू, आजतागायत नमूद कंपनीने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा एक रुपयाही दिलेला नाही. खरे तर श्रीगोंदा तालुक्यातील कृषी विभागाचा अहवाल सकारात्मक असून, त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात सन २०१९ मध्ये ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये ४५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचा अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आलेला आहे. या अहवालानुसार श्रीगोंदा तालुकातील शेतकरी पिक विम्यास पात्र ठरत आहेत. परंतू, बजाज आलायन्स कंपनी स्कायमेटचा अहवालानुसार पैसे देण्यास तयार नाही.

या पद्धतीने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर बजाज अलायन्स कंपनीकडून तसेच कृषी विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने अन्याय होत असल्याचे मत आहे. नगर जिल्ह्यातील इतर तालुके पात्र ठरत असतांना, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अशा प्रकारे अन्याय केला जात असल्याचे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत नमूद केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षामार्फत सामान्य जनतेसाठी, शेतकरी बंधुंसाठी आहोरात्र काम चालु आहे व ते चालु रहाणार आहे. परंतू, माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की, श्रीगोंदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार अशा पद्धतीने गप्प का आहेत ? त्यांनी आमदार या नात्याने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आवाज का उठविला नाही ? श्रीगोंदा तालुक्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अडचणीत आलेला शेतकरी, कामगार वर्ग, गोरगरीब जनतेसाठी धावून जायचे काम विद्यमान आमदारांच्या माध्यमातून झाले पाहिजे होते. परंतू, श्रीगोंदा तालुक्यातील जनता, शेतकरी या सर्वांनाच वाऱ्यावर सोडून दिले अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्याचे वामन भदे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले आहे.

याबरोबरच तालुक्यात प्रत्येक कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालु असून, यामध्ये जलसंधारण खात्याचा विषेश उल्लेख प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. श्रीगोंदा शहराच्या आजुबाजूला झालेली बंधाऱ्याची कामे तसेच शेडगाव येथील रणसिंग वस्ती, बोबडे वस्ती व श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच जलसंधारणाची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे भदे यांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात देखील यापासून वेगळे घडत नाही. घोडेगाव फाटा ते शेडगाव फाटा या कामाची दुरुस्ती वर्षामध्ये चार वेळेस करण्यात आलेली आहे. तसेच, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा – पारगाव रस्त्याची दुरुस्ती असेल, श्रीगोंदा – कारखाना रस्त्याची दुरुस्ती असेल, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा शहर ते घोडेगाव रस्ता हा सुद्धा योग्य पद्धतीने झालेला नसून, अर्धवट स्थितीमध्ये आहे. या सर्व विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. हा सर्व पैसा गोरगरीब जनतेचा व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचा आहे आणि या पैशांची लुट अधिकारी, ठेकेदार, पुढारी हे सर्व मिळून करत आहेत. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या सर्व प्रश्नांना वाचा फोडायचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केले जाणार असू, दिनांक २२/०६/२०२० वार सोमवार रोजी श्रीगोदा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात वामनभाऊ भदे (प्रहार जनशक्तीपक्ष जिल्हा उपाध्यक्ष) यांचे नेतृत्वाखाली आमरण उपोषण केले जाणार आहे. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी आपापल्या गावामध्ये उपोषण करण्यासंदर्भात तहसिलदार साहेब यांना निवेदन सादर करणार आहेत.

यावेळी (तालुका अध्यक्ष) कृष्णाभाऊ खामकर, (शहरअध्यक्ष) माधवभाऊ बनसोडे, (जिल्हा संघट) साहेबराव रासकर, आमोलभाऊ धेंडे, बाबासाहेबजी दरोडे, अशोकजी माळशिकरे, बाळासाहेब वाळके पाटील, गंगारामजी दरोडे, सचिनभाऊ जाधव, भुषभाऊ साळवे, योगेशजी खलाटे, बाळासाहेबजी जाधव, मुनीरभाई शेख, विश्वासराव सुडगे, नितीन कांबळे, विजयजी शेंडगे, नितीनजी शेंडगे, सुभाष गांजुरे, भागवत व्यवहारे, संतोश गायकवाड, अजीत गायकवाड, ज्ञानदेव भैलुमे, अशोक वाळूज आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading