श्रीगोंद्याचा अभिमान: बाबूराव बोत्रेपाटील यांना “उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार”

दिनांक २३ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:

साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन आयोजित ७० वी वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो २०२५ मध्ये ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रेपाटील साहेब यांना “उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

हा मानाचा सन्मान ओमराजे बाबूराव बोत्रेपाटील यांनी स्वीकारला.

पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालिका डॉ. सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, एस.टी.आय.ए.चे अध्यक्ष संजय अवस्थी आणि एस.आय.एस.एस.टी.ए.चे अध्यक्ष एन. चिन्नप्पन आदी मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply