प्रा. राजेश्री शिंदे यांची संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी निवड; जम्बो कार्यकारणी जाहीर..

दिनांक १७ मार्च २०२५,श्रीगोंदा:

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या प्रा. राजेश्री सतिश शिंदे यांची संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ रथ यात्रेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी त्यांची सर्वानुमते निवड जाहीर केली. यावेळी ब्रिगेडची जम्बो कार्यकारणीही घोषित करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडच्या या विशेष बैठकीस मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुरेश इथापे अध्यक्षस्थानी होते. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष बंटी भिंगारदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजि. शाम जरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नव्या महिला जिल्हाध्यक्षा प्रा. राजेश्री शिंदे या उच्चशिक्षित असून त्या सनराईज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय व फॅशन डिझायनिंग कॉलेज या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याचा व्यापक अनुभव घेत आहेत. त्यांना शिक्षण क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक अनुभव असून समाजकार्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष परकाळे म्हणाले की, “संभाजी ब्रिगेडमध्ये सक्रियपणे काम करण्यास इच्छुक असणाऱ्या मावळ्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच लवकरच केडर कॅम्प आयोजित करून पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले जाईल. ‘१००% समाजकारण आणि १००% राजकारण’ या सूत्राने कार्य करण्याची अपेक्षा प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडून आहे.”

संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे –

  • महिला जिल्हाध्यक्षा: प्रा. राजेश्री सतिश शिंदे
  • जिल्हा उपाध्यक्ष: संजय सोनवणे
  • कामगार आघाडी तालुकाध्यक्ष: घनशाम काळे
  • युवक तालुकाध्यक्ष: सुहास गाडेकर
  • तालुकाध्यक्ष (डॉक्टर आघाडी): डॉ. अरुण ढवळे
  • तालुकाध्यक्ष (ओबीसी आघाडी): शहाजी खेतमाळीस
  • तालुकाध्यक्ष (शेतकरी आघाडी): उत्तम घागरे
  • युवक तालुका उपाध्यक्ष: सचिन कोहक, प्रशांत गोडसे, राहुल कणसे
  • तालुका सचिव: सुयोग धस
  • शहराध्यक्ष: सुहास होले
  • तालुका उपाध्यक्ष: संदीप जगताप, संतोष जावळे, रविंद्र महंडूळे

संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रा. राजेश्री शिंदे म्हणाल्या, “राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतीला वंदन करत मी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रभावी काम करीन. हा माझ्यासाठी सन्मानास्पद आणि जबाबदारीने भरलेला क्षण आहे. समाजहितासाठी झोकून देऊन कार्य करण्याचा माझा निर्धार आहे.”

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading