रमाईचा त्याग प्रेरणादायी: प्रशांत चव्हाण

दिनांक ९ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

माता रमाईचा त्याग बहुजन महिलांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन प्रबोधनकार प्रशांत चव्हाण यांनी केले. रमाई महिला बचत गट व पंचशिल महिला बचत गट चिंचणी यांनी आयोजित केलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सतिश ओहोळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा शेलार होत्या.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी बोलताना चव्हाण सर पुढे म्हणाले की, माता रमाईने बाबासाहेबांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. बहुजन समाजासाठी आपले चार आपत्य गमावले. भारतात ज्या महनीय स्त्रिया होवून गेल्यात त्या म्हणजे तथागत गौतम बुध्द यांच्या सहचारिणी माता यशोधरा, दुसऱ्या राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांच्या सहचारिणी क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले, तिसऱ्या म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्या सहचारिणी जिजाऊ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी रमाई माता यांचा उल्लेख केल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही. महिलांनी त्यागमूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी त्याग केला पाहिजे. अशी प्रेरणा मिळेल तरच, आपल्या जीवनाचं सार्थक होईल.

रमाईच्या कर्तव्याचा, सहनशक्तीचा, निष्ठेचा आदर्श घेवून आपले जीवन व्यतीत करायला पाहिजे. त्यांच्यामुळेच बाबासाहेब आपले कार्य पार पाडू शकले. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनात सुख आणि समृध्दीचा प्रवाह निर्माण झाला. रमाई स्वत: झिजल्या पण, सुगंध मात्र समाजाला देवून गेल्यात. समाज जगवला म्हणून, माता रमाईस नऊ कोटींची आई म्हटले जाते.

यावेळी रमाई महिला बचत गट (अध्यक्ष) माया शेलार, (सचिव) उमा शेलार, पंचशील महिला बचत गट (अध्यक्ष) सोनाली शेलार, (सचिव) आरती शेलार, आशा शेलार, राणी शेलार, रोहिणी शेलार, ज्योती गायकवाड, राजश्री थोरात, भारत शेलार, राहुल शेलार, शांताराम थोरात इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शांताराम थोरात यांनी केले. तर, आभार उमा शेलार यांनी मानले.

स्त्रोत:(प्रशांत चव्हाण सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading