येळपणेत चार एकर माळरान शेती. पती चे शिक्षण चौथी पास तर माझा निशाणी अंगठा. पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यातील रासकर यांच्या विटभट्टीवर दोघा नवरा बायकोनी आठ वर्षेचिखलाशी झुंज दिली. पुन्हा येळपणेत स्थायिक झाले. जयश्री भाऊसाहेब आडसुरे या रनरागिनींने नऊ वर्षापुर्वी दोन गायावर दुधाचा व्यवसाय सुरू केला सध्या २२ गाई असुन दरमहा एक लाखाची कमाई ही रनरागिनीं करत असुन दोन्ही मुलांना पदवीधर केले आहे.
नामदेव आडसुरे यांनी माजी सभापती सखाराम जगताप यांच्याकडे सालकरी म्हणून काम केले. भाऊसाहेब व बाळासाहेब ही दोन मुल झाली. बाळासाहेबांनी वेल्डींगचे काम करून आंळदी गाठली. भाऊसाहेब यांचे सन १९९४ ला अजनुज येथील तात्यासाहेब गिरमकर यांची कन्या जयश्री हिच्याशी झाला लग्नाचे बाशिंग सोडले आणि मोलमजुरी करण्यास सुरूवात झाली. शरद व मनिषा ही दोन मुल झाली.
हे कुंटूब कर्जबाजारी झाले सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी विट भट्टीवर काम करण्यासाठी पुणे गाठले. पाच वर्षेपुण्यात तर तीन वर्षे येळपणेतील विटभट्टीवर काम केले जयश्रीबाईनी दोन संकरित गाई घेतल्या दुधाचा व्यवसाय सुरू केला. काष्टीचे दादा चांदगुडे केशव महाडीक, सचिन महाडीक यांनी लाखमोलाची मदत केली. दोन गाईच्या गोठ्यात २२ गाई आल्या आणि दुधातून चांगली कमाई सुरू झाली. आडसुरे परिरावाराचे घर गोकुळ झाले.
शिरसगाव बोडखा येथील सिध्दीविनायक मिल्किंग मशीनचे नंदकुमार गाडेकर यांनी आडसुरे यांना दुध काढण्यासाठी मशीन बसुन दिले. गाईचे आरोग्य व निगा राखण्यासाठी गोठ्याची रचना करून दिली. जयश्री आडसुरे यांनी स्व: ताला दुध व्यवसायात झोकून दिले. नऊ वर्षात परिस्थिती बदलली आहे. शरद पदवीधर तर मनिष महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. येळपणेतील नागरिकांचा आडसुरे परिवाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. संघर्षावर मात करून झेप घेणारे कुंटूब असा झाला आहे. त्यामुळे या परिवाराला मानसन्मान मिळू लागला. हे श्रम आणि संस्काराचे प्रमाण पत्र आहे.
मनीषा खड्यात पडली आणि शरद चुकला
शरद आडीच वर्षाचा आणि मनिषा सहा महिन्याची दोन लेकर उराशी बाळगून पुण्यात विटभट्टीवर कामाला जिथे ना घर ना दार धो धो पाऊस सुरू झाला. दोन लेकरांना एका झोपडीत टाकले. आम्ही नवरा बायको रात्रभर पावसात उभे होतो. दुसऱ्या दिवशी वीट भट्टीचे काम सुरू झाले. आम्ही नवरा बायको कामाच्या नादात मनिषा रांगत रांगत पाण्याच्या खड्याकडे गेली खड्यात पडणार तोच एका मजुराने तिला धरली. क्षणाचाही विलंब झाला असता तर मनिषा आम्हांला दिसली नसती. शिरूरच्या आठवडे बाजारात शरद चुकला होता सहा तासांनी सापडला त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. हे प्रसंग आठवले कि अंगावर शहारे येतात.
संदेश
गरिबी ही श्रीमंती येणार यांची चाहुल असते. पत श्रम करण्याची तयारी ठेवली तर निश्चितच जीवनाचे चित्र बदलते यांचा आनंद मोठा असतो. तरूणांनी दुधाचा व्यवसाय चांगल्या पध्दतीने करावा. मोठी संधी आहे. जयश्री आडसुरे येळपणे
स्त्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
