दिनांक २७ नोव्हेंबर २०२५,आढळगाव, ता. श्रीगोंदा:
आढळगाव (Adhalgaon) येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी विविध प्रलंबित प्रश्नांवर, विशेषतः शेतीसंबंधी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी श्रीगोंदा-आढळगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) केले. आढळगावच्या उपसरपंच व तालुका पंचायत समितीच्या सदस्या अनुराधा ठवाळ आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या गंभीर अडचणी मांडल्या आणि श्रीगोंदा पोलिस स्टेशन परिसरातील विजेसाठी नवीन १०० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर तत्काळ मंजूर करावा, अशी प्रमुख मागणी केली.

युवा नेतृत्व श्रीकांत ठवाळ यांनी यावेळी शेतकऱ्यांचे पुत्र असल्याची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांची बाजू धरत, आढळगावसाठी नवीन सबस्टेशन (Substation) ची निर्मिती करण्याची पोटतिडकीची मागणी केली. त्यांनी इतरही सर्व प्रश्न प्रभावीपणे मांडले. उपसरपंच अनुराधा ठवाळ यांनी ग्रामस्थांच्या व्यथा मांडून उपस्थित सर्व अधिकारी, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
या आंदोलनादरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आणि मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर, आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि रस्ता रोको आंदोलन स्थगित केले.
उपस्थित मान्यवर आणि अधिकारी
यावेळी महावितरण (MSEDCL) विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता डबीर साहेब (कर्जत)..उपकार्यकारी अभियंता इंदलकर साहेब (श्रीगोंदा).. सहाय्यक अभियंता कट्टी साहेब.. पोलिस प्रशासनाकडून गोपनीय खात्याचे सचिन गोरे, पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, पोलिस सहाय्यक संभाजी साबळे हे होते.
या आंदोलनात दिगांबर गव्हाणे, पोपटराव छत्तीसे, पांडातात्या काळे, बबनराव काळे, चंदर काळे, धनु काळे, वामनराव पवार, नवनाथ काळाने, अरुण खोडवे, पांडुरंग काळे, पठाडे मामा, उत्तम काळे, बाळू काळे, नंदू राऊत, नवनाथ बोळगे, शंभो शिंदे, केशव कोकणे, बजरंग डोके आदींसह असंख्य शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
