दिनांक २८ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
कै. वसंतराव औटी: ३५० हून अधिक विवाह जुळवणारे, लिंबू व्यवसायातून समाजकार्य करणारे द्रष्टे समाजसेवक.!
श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेले अनिल औटी (महाराज) हे त्यांच्या मोठ्या सामाजिक योगदानामुळे चर्चेत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या दिवंगत वडिलांनी, कै. वसंतराव सखाराम औटी, यांनी अनेक दशके औटीवाडी, हिरडेवाडी, सिद्धार्थनगर आणि ससाणे नगर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात व अडचणींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
अनिल औटी (महाराज) यांनी आपल्या वडिलांच्या कार्याबद्दल बोलताना सांगितले की, कै. वसंतराव औटी यांचा सामाजिक दृष्टिकोन अत्यंत व्यापक होता.
त्यांनी परिसरातील सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून साडेतीनशे पेक्षा जास्त विवाह जमवले, तर काही लग्ने स्वखर्चातून लावून दिली, ज्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचण आली नाही.

लिंबू व्यवसाय करत असताना त्यांनी सहकाऱ्यांना तो व्यवसाय शिकवला आणि आपला व्यवसाय मुंबईपर्यंत नेला.
वारकरी संप्रदाय आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या या कुटुंबाने समाजाच्या हितासाठी काम केली. कै.वसंतराव औटी यांनी दर महिन्याला लोकांना आळंदीला घेऊन जाण्याचा आगळावेगळा उपक्रम चालवला.
औटीवाडी परिसरात आणि शहरात प्रथम माळकरी होऊन त्यांनी तात्या महाराज महापुरुष यांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी कामे केली.
वडिलांचा हाच सामाजिक वारसा पुढे चालवत अनिल महाराज आणि त्यांचे बंधू चंद्रकांत औटी यांनी परिसरासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत:
सन २०१४ मध्ये दुष्काळाचे सावट पाहून त्यांनी स्वखर्चातून बोरवेल मारून औटीवाडी परिसरात पाणी उपलब्ध करून दिले.
आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांना मदत केली, तसेच समाजातील मुलांना शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून स्वखर्चाने मदत केली आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी १९ वर्ष वैष्णव मेळा भरवून लग्न सोहळे यशस्वीपणे पार पाडले.
कोरोना काळात अनिल औटी महाराज यांनी श्रीगोंदा शहरातील अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णसेवेच्या दृष्टीने रुग्णांना चहा/पोहे असा अल्प उपहार (अन्नदान) आणि रुग्णसेवा देण्यात त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.
फुप्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी मोठ्या खर्चाला सामोरे जाणाऱ्या रूपाली औटी या मुलीला आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला. तसेच सोनू बन्सी शेळके यांना स्वतःचा प्लाजमा देऊन रुग्णांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

जे वाद कोर्टकचेऱ्यांपर्यंत जाऊ न देता जागेवर मिटण्याजोगे आहेत, त्यांचा निपटारा त्यांनी स्वतः केला. स्थानिक प्रशासनाशी असलेल्या ऋणानुबंधाच्या संबंधांमुळे त्यांना हे शक्य झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती/पुण्यतिथी, आणि नुकताच झालेला संविधान दिन पुढाकाराने साजरा करून त्यांनी सर्वसमावेशक काम केले आणि महापुरुषांप्रती आदर व्यक्त केला.
मनोहर पोटे यांच्या नेतृत्वात, अनिल औटी (महाराज) (सर्वसाधारण जागा) आणि सौ. आरती कुणाल शिरवाळे (अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला जागा) हे शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक चारमधून मोठ्या ताकतीने निवडणूक लढवत आहेत.
तर साई उद्योग समूहमार्फत अनिल औटी (महाराज) यांनी औटीवाडी, हिरडेवस्ती, सिद्धार्थनगर आणि ससाणेनगर परिसरातील नागरिकांना, बंधू-भगिनींना, आणि शेतकरी बांधवांना भरघोस मताने विजय मिळवून देण्याचे आवाहन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून केले आहे.
स्रोत:(मुलाखत)
