सागर बंडु धावडे यांची राजापूर वि.का.सेवा.सह. सोसायटीच्या व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड…

दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

राजापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हा. चेअरमन पदावर श्री. सागर बंडु धावडे यांची बिनविरोध निवड झाली. सौ. अंजुबाई धोंडीभाऊ धावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.

सहाय्यक सहकारी अधिकारी (सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा)८ कु. अमृता भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था श्रीगोंदा यांच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी राजापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. श्रीपाद कवाष्टे, सर्व संचालक मंडळ तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित व्हा. चेअरमन श्री. सागर धावडे यांचे गावकऱ्यांतर्फे आणि सहकारी संस्थेच्या सदस्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले. त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रमुख उपस्थित मान्यवर:

  • अशोकभाऊ वाखारे (चेअरमन, श्री संत सदाशिव बाबा सोसायटी, राजापूर)
  • दिलीप थेऊरकर (उपसरपंच, राजापूर)
  • काळुराम गवारे
  • रघुनाथ धावडे
  • भास्कर कवाष्टे
  • दत्तात्रय कवाष्टे
  • बाळासाहेब वीर
  • नामदेव व्यवहारे
  • अनिल व्यवहारे
  • वैभव वाखारे
Advertise…

या निवडीनंतर श्री. सागर बंडु धावडे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालक मंडळ व सभासदांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवर…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading