दिनांक ३० जुन२०२४, कोळगाव, श्रीगोंदा:
कोळगाव येथे हजरत सय्यद अहमद शहा अकबरशहा (रहे) उर्फ कोळगाववाले बाबा यांचा संदल व उर्स मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कर्नाटक, गुलबर्गा, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद व इतर दूरवरून भाविकांनी हजेरी लावली होती.
सालाबाद प्रमाणे कोळगाव येथील सर्व धर्मियांचे भक्ती स्थान असलेले कोळगाववाले बाबा यांचा संदल व उर्स बाबांच्या मठामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या हस्ते बाबांच्या कबरीवर चादर अर्पण करण्यात आली.

तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांचा सत्कार हाजी करीम हुंडेकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यानिमित्ताने ठेवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमासाठी बेलवंडी गावचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी उपस्थिती लावली. मुंबई येथील मशहूर कव्वाल जनाब अदनान अजीम नाझा यांनी बहारदार कव्वाली पेश केली. साजन पाचपुते यांनी तासभर कव्वालीचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी शरीफ पिरजादे, असलम पिरेजादे, नवाज पिरजादे, रईस पिरजादे, मुराद पिरजादे, मोहसीन पिरजादे, जिल्हा अल्पसंख्यांक राष्ट्रवादी पवार गटाचे सचिव असीर शेख, श्रीगोंदा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश डूबल, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, शिवसेनेचे कोळगाव शहराध्यक्ष प्रवीण खेतमाळीस, सलीम तांबोळी, मजहर शेख व इतर आयोजक उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)




