दिनांक ९ डिसेंबर,श्रीगोंदा:
संत संताजी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांचे शिष्य यांची जयंती संत रोहिदास चौक,श्रीगोंदा येथे मोठ्या थाटात साजरी झाली.या प्रसंगी तेली व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. मनीषा महेश लांडे , गरसेविका सौ. वनिता संतोष शिरसागर, बामसेफ जिल्हाध्यक्ष गायकवाड सर, सचिन झगडे सर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याबद्दल सखोल अशी माहिती दिली.

जगतगुरु तुकाराम महाराज लिखित गाथा पाण्यात बुडवल्यानंतर पूर्ण गाथा तोंडपाठ असणारे संत म्हणजे जगनाडे महाराज यांच्या अतिशय सुंदर लेखणीतून पुन्हा गाथा निर्मिती झाली आणि जगप्रसिद्ध झाली.या संताच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अशोक भाऊ खेंडके, संभाजी ब्रिगेडचे नाना शिंदे, उद्योजक विक्रमजी काळे, रमेशजी काळे, नपा पाणी पुरवठा विभागाचे भागवत, महेशजी धोत्रे, हनुमंत उदमले, मच्छिंद्र तात्या उदमले तसेच शिवनेरी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित होते.
स्रोत:(नानासाहेब शिंदे,तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड)
