“५ सप्टेंबर” शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळणार:प्रा.पांडुरंग भोपळे..

दिनांक २४ ऑगस्ट, पुणे/श्रीगोंदा:

मूव्हमेंट फॉर टीचर्स राईट्स” संघटनेच्या वतीने पुणे येथे शिक्षण आयुक्त यांना शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात निवेदन देण्यात आले.संघटनेचे राज्य निरीक्षक प्रा. पांडुरंग भोपळे याबाबत म्हणाले की, शासन हे आमच्या शिक्षकांवर का चिडलेले आहे ? हे आम्हाला समजत नाही.माझा शिक्षक हा १०-१५ वर्षे बिनपगारी ज्ञानदानासाठी राबत असताना त्याच्यावर इतका मोठा अन्याय का केला जात आहे ? या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी विचार करायला गेल्यानंतर बुद्धी मात्र क्षीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या शिक्षकावर या आर्थिक संकटावर मात करत असताना, विध्यार्थ्यांना प्रकाशाच्या वाटा दाखवत त्यांच्या जीवनात मात्र अंधकार आणि काळोख निर्माण झाला आहे. माझ्या काही बांधवानी तर या संकटामुळे जीवन संपवण्याचा विचार केला आणि जीवनाचा अंत आत्महत्या करून केलेला आहे.

शेतकरी आत्महत्या पाठोपाठ शिक्षक आत्महत्याचे संकट महाराष्ट्र शासनापुढे उभे राहिले आहे. या जीवन संपवण्यामुळे माझ्या शिक्षकाचा पूर्ण प्रपंच उघड्यावर आला आहे. या सर्व गोष्टीसाठी फक्त शासनच जबाबदार आहे आणि राहील. सत्ता कोणत्याही राजकीय पक्षाची असो त्यांना मात्र सत्तेवर आल्यानंतर माझ्या शिक्षक बांधवांचा विसर पडतो असेही ते म्हणाले आहेत.

१३ सप्टेंबर २०१९ रोजी प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेज घोषित करून, त्यांना एक रुपयासुद्धा वेतन दिलेले नाही. तसेच क्षेत्रीय वरील संचालक, आयुक्त आणि मंत्रालय वरील अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेज यांना घोषित करण्याऐवजी २४/१४/१२ कॉलमची माहिती मागवून माझ्या बांधवावर संभ्रम निर्माण करत आहे. कारण शासनाने सर्व याद्या जाहीर केल्या नाहीत.त्यामुळे माझा शिक्षक बांधव पूर्ण घाबरलेला आहे. त्यांना त्यांची फाईल कुठे आहे समजत नाही.सर्व अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेज यांना १३ सप्टेंबर २०१९ प्रमाणे प्रचलित नियमानुसार अनुदानसह घोषित करावे. शासन हा निर्णय घेत नसल्याने तमाम महाराष्ट्रातील शिक्षक येणारा ‘५ सप्टेंबर’ हा शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळणार आहेत. प्रा.भोपळे यांनी नमूद केले आहे.

या सर्व मागणी संदर्भात शिक्षण आयुक्त, पुणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, ‘मूव्हमेंट फॉर टीचर्स राइट’ संघटनेचे (राज्य निरीक्षक) प्रा. पांडुरंग भोपळे, (राज्यकार्याध्यक्ष) प्रा.नालंदे.डी. आर, (राज्य संघटक) प्रा.सोनवणे.आर.बी, (नाशिक विभाग प्रमुख) प्रा.नितीन झणझणे, (राज्य सल्लागार) प्रा.गिरमकर.डी.बी, (राज्य प्रसिद्धी प्रमुख) प्रा.राम सोनवणे, प्रा.परशुराम शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रा.नितीन झणझणे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading