दिनांक २० जून (मढेवडगाव,श्रीगोंदा):
येथील सरकारी ठेकेदार व प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांचे तिन्ही मुले खडतर परिश्रम, शिक्षक व पालकांचे सुनियोजित मार्गदर्शनामुळे प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ आधीकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.
अजय दत्तात्रय शिंदे हा पहिली ते दहावी पर्यंत गावातील मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पुढील शिक्षण पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील असूनही,बुद्धिमत्तेच्या जोरावर गतवर्षी विक्रीकर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. परंतु, पुन्हां परीक्षा देऊन, आता उप- जिल्हाधिकारी पदी झेप घेतली आहे. तर, नरेंद्र या भावानेही गावातच शालेय शिक्षण घेऊन, पुढे पुण्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन नायब तहसीलदार पदी त्याची नियुक्ती झाली आहे.
या दोन्ही मुलांची एकाचवेळी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून, नेमणूक झाल्याने कुटुंब व गावच्या आनंदाला उधान आले आहे. शिंदे कुटुंबाचे अभिनंदन व यश साजरे करायला लोक सोशल डीस्टंसिग पाळून त्यांच्या घरी हजेरी लावत आहेत.
