दिनांक १८ मार्च २०२५, श्रीगोंदा:
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्रीगोंदा येथे शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणुकीसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मागील ४३ वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार यावर्षीही शहरात ऐतिहासिक शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

मिरवणुकीत दणदणीत बँड आणि आकर्षक रथाचे विशेष आकर्षण..
शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बाबूलाल बँड (बाबूलाल मास्टर), पाटोदा बँड (लेखात भाई), बारामती बँड (शकील भाई), श्रीगोंदा बँड (अनिल ननवरे) आणि श्रीगोंदा रथ (शशिकांत शिंदे) यांनी विशेष सहभाग घेतला. साईप्रसाद नावाच्या विशेष सजवलेल्या रथातून महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. शिवसेना (शिंदे गट) तर्फे शिवजयंती सोहळ्यातील बँड वादकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत सातत्याने सहभाग देणाऱ्या बँड मालक व वादकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शिवजयंती उत्सवात माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते, श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष शुभांगी मनोहर पोटे, माजी उपनगराध्यक्ष वैशाली नंदकुमार ताडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे, श्रीगोंदा नगरपरिषदेचे गटनेते बापू तात्या गोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे, शिवसेना श्रीगोंदा शहरप्रमुख नितीन गायकवाड, युवासेना शहरप्रमुख संदीप भोईटे,

अंबादास औटी, संतोष शिरसागर, अनिल हिरडे, पत्रकार अनिल तुपे, बाळासाहेब काकडे, माजी नगरसेवक आसिफ भाई इनामदार, शिवसैनिक अनिल सुपेकर, नगरसेवक नानासाहेब कोथिंबीरे, धनु कोथिंबीरे, विलास ननवरे, राजू जवारे, सचिन नन्नवरे, रोहित नन्नवरे, सुनील खंडागळे, नागेश ढवळे, धनु खेत्रे, शंकर नन्नवरे, बाप्पू भोईटे, काळूराम ताडे, प्रकाश ताडे, शिवराज नंदकुमार ताडे, तसेच अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रात्री ११:०० वाजता भव्य मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या सोहळ्यात शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भविष्यातही ही परंपरा मोठ्या दिमाखात सुरू ठेवणार असल्याचे आयोजक ताडे यांनी सांगितले.
स्रोत:(शिवजयंती उत्सव)
