दिनांक ६ मार्च, श्रीगोंदा:
भारत सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ काल दिनांक ५ मार्च रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा कर कायदा २०२०, अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२० या तीन कायद्यात केंद्र सरकारने बदल केल्याने, नमूद कायद्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने नमूद धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतोष जठार, भाऊसाहेब दांडेकर, अनंता पवार, दत्तात्रय गोरखे, महेंद्र थोरात, संतोष जौंजाळ, संतोष भोसले, संतोष थोरात, प्रेरणाताई धेंडे, राजू फाजगे, सचिन गोंटे, सागर थोरात, विनोद थोरात सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)..
