दिनांक २५ जानेवारी (चोराचीवाडी,श्रीगोंदा):
तालुक्यातील चोराचीवाडी ग्रामपंचायत निवडणुक २०-२१मध्ये महाविकास आघाडी पॅनेल भरघोस मताने विजयी झाला. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रमुख गाडे सर, माजी आमदार राहुल दादा जगताप, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजू दादा नागवडे, शिवसेना संघटक नंदकुमार ताडे, शिवसेना शहर प्रमुख संतोष खेतमाळीस यांच्या सहकार्याने पॅनेल चं नेतृत्व संजय अनभुले यांनी केले.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे संचालक विजयराव कापसे, विनायक साळुंखे, बाळासाहेब साळुंके, दत्तात्रेय बळवंत साळुंखे, अजित दिंडे, पांडुरंग लांडगे, विठ्ठल तात्या साळुंखे, आबा साळुंखे व शिवसेना तालुका उपप्रमुख माजी सरपंच संतोष शिंदे यांनी पॅनेल आणण्यासाठी प्रयत्न केले.
महाराष्ट्राभर ग्रामपंचायत निकाल लागले. मागील निवडणुकीमध्ये भाजपचे वर्चस्व दिसत होते. मात्र, आता संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसत आहे. त्याचे कारण श्रीगोंदा तालुक्यामध्ये चोराचीवाडी या गावांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे मिळून विकास आघाडी केली होती. या ठिकाणी ९ उमेदवार होते. माघे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते आणि उरलेले पाच उमेदवार चांगल्या मताने निवडून आले आहेत.
यापुढील काळात ग्रामपंचायत व सर्व सदस्य मतदारांना कुठलीही उणीव भासू देणार नाहीत, कुठलेही सामाजिक काम असो किंवा सरकारी गावाला निधी आणण्याचा विषय असो, सर्व सदस्य एक जीवाने गावासाठी प्रयत्न करतील. असे शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.
मागील पाच वर्षांपूर्वी संजय गोरख अनुभवले यांना पाचपुते गटाने उमेदवारी दिली होती. परंतु, याच गटाच्या काही कार्यकर्त्यांनी तुकाराम चव्हाण यांचा जाणीवपूर्वक अपक्ष फार्म ठेवाला. त्यावेळेस संजय अनुभवले यांचा १२ मतांनी प्रराभव झाला. परंतु, यावेळेस संजय यांनी ठरवली होती की, याची परतफेड करायची आहे. म्हणून, त्यांनी सर्व तरुण मंडळी एकत्र करून महाविकास आघाडीचा पॅनेल तयार केला.
गावामध्ये शिवसेनेचे मोलाचे कार्य असते, त्यामुळे सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांनी एकत्र येऊन, त्यांनी कुठेही उमेदवारी न करता गणेश अनुभवले व संजय अनभुले यांनी ९ – ० करण्याचा विडाच उचलला होता. सर्व गाव एकत्र करीत त्यांनी हा उपक्रम यशस्वी करून दाखवला. विजयी उमेदवारांना सर्व ग्रामस्थांनी विकासासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीगोंदा तालुका शिवसेना संघटक नंदकुमार ताडे, संतोषजी खेतमाळीस (शिवसेना शहरप्रमुख) यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल सर्व उमेदवारांनी त्यांचे आभार मानले. २००५ साली ग्रामपंचायतीत शिवसेनेचे संतोष शिंदे दहा वर्षापूर्वी निवडून आले होते. यावर्षी सुद्धा मनीषा संतोष शिंदे या बिनविरोध झाल्या आहेत.
स्रोत:(संतोष शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्र)
