दिनांक २२ जून, श्रीगोंदा:
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यावर काल बाळासाहेब नाहाटा यांनी शिवीगाळ करीत दमबाजी केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनेने एकत्र येवुन, काळ्या फिती लावत, नायब तहसीलदार योगिता ढोले (मॅडम) यांना निषेध निवेदन सादर केले. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करीत, शासनाने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनातुन केली आहे.

यावेळी कार्यालयीन (अधिक्षक) दातीर एस एम, गोसावी ए एस, (वरिष्ठ सहाय्यक) शिंदे एम डी, (कनिष्ठ सहाय्यक) कुलकर्णी पी ए, (उप अभियंता बांधकाम) जगताप डी पी, (उप अभियंता) ठुबे डिके, (शाखा अभियंता बांधकाम) कांगुने डीडी, भोसले जी एन, इनामदार सह विविध कर्मचारी महिला पुरुष उपस्थित होते. shrigonda- protest- against- the- incident- of- insulting- and- bullying- bdo- prashant- kale
स्त्रोत:(निवेदन)
