दिनांक ५ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने इंधन दरवाढ निषेधार्थ पूर्ण राज्यभर आंदोलन छेडले आहे. शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, युवा सेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीगोंदा तालुका तहसील कार्यालय येथे इंधन दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सदर निवेदन नायब तहसीलदार चारुशीला पवार व भाऊसाहेब होगले यांना देण्यात आले.

यावेळी (शिवसेना शहर प्रमुख) संतोष खेतमाळीस, (युवा सेना तालुका प्रमुख) हरिभाऊ काळे, (उपतालुकाप्रमुख) संतोष शिंदे, (शिवसेना तालुका संघटक) नंदकुमार ताडे, (मा.शहर प्रमुख) सुरेश देशमुख, (युवा सेना तालुका संघटक)नावाभाऊ पवार, (युवा सेना शहर प्रमुख) ओमकार शिंदे, अनिल सुपेकर, शिवाजी दांगडे, संभाजी घोडके, म्हस्के मामा, दादासाहेब ढगे, जयराजे गोरे, संतोष चिकलठाणे, योगेश भुतकर, अनिकेत परदेशी, किरण बनसुडे, संतोष चिखलठाणे आदी शिवसैनिक युवासैनिक हाजर होते.
स्रोत:(हरिभाऊ काळे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
