पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगडच्या दुर्गम भागातून श्रीगोंदयात आलेल्या बांधकाम मजुराचा पोटंचा गोळा हिरावला..या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ..

दिनांक २४ मे, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील एका बांधकाम व्यवसायकाकडे मजूर म्हणून कामाला आलेल्या छत्तीसगड येथील बांधकाम मजुराच्या आठ वर्ष्याचा मुलाचा खेळत असतांना सर्पदंश होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल दिनांक २३ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो मैल छत्तीसगडच्या दुर्गम भागातून श्रीगोंदा सारख्या ठिकाणी येऊन, बांधकाम मजूर म्हणून तालुक्यातील विविध भागात काम करणाऱ्या नेत्राम यादव यांच्या मुलाचा काल गवतात खेळतांना सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने, त्यांचा पोटंचा गोळाच हिरावला आहे. आठ वर्षाचा प्रमोद हा त्याच्या मित्रांसोबत गवतामध्ये खेळत होता. त्याला सर्पदंश झाला. ही बाब त्याने घरच्यांना लागलीच सांगितली नाही. खेळण्याच्या नादात झालेल्या दुर्दैवी प्रकारानंतर घरच्या लोकांना निदर्शनास आल्यावर रक्त का वाहत आहे? अशी त्यांनी विचारणा केली. तर, खीळा लागल्याचे प्रमोदने सांगितले. मात्र, काही वेळाने त्याला त्रास होऊ लागल्याने, प्रमोदला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. shrigonda- the- construction- worker- who-came- from- a- remote- area – of-​ chhattis garh-to-fill-his-stomach-was-deprived-of-his – stomach-this- unfortunate-incident-caused-a-stir-in-the-area

आठ वर्षीय प्रमोदवर काल श्रीगोंदयात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर पोटासाठी वणवण करणाऱ्या यादव कुटुंबियांनी आज परतीचा प्रवास सुरु केला. मागील चार पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कुटुंबाने सोबत आणलेले संसारोपयोगी साहित्य घेऊन, पुन्हा गावाची वाट धरली. जातांना त्यांच्या अक्रोशाने सर्वांचेच डोळे पाणावले. सिद्धिविनायक बांधकाम कंपनीचे दरेकर यांनी यादव कुटुंबाला मदत केली आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

(प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading