सिध्दार्थनगरची शाळा..

श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या सिध्दार्थनगर येथील शाळा गरिबांच्या मुलांसाठी ज्ञानदानाचे काम सुरु आहे. पाचवीला गरिबी पुजलेल्या या वस्तीतील लेकरांना ज्ञानमंदिरात पाय ठेवण्यासाठी सुरुवातीच्या काळात पायपीट करत – करत गावातील थोरल्या शाळेत जावं लागायचं. त्यामुळं या वस्तीवरील लेकरं शाळेत जात नव्हती. अनेकांनी शाळेला रामराम ठोकला. त्यातूनच सिध्दार्थनगरमध्ये शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. ९ ऑगस्ट १९९४ रोजी या शाळेची स्थापना झाली.

श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या सिध्दार्थनगर येथील शाळा गरिबांच्या मुलांसाठी ज्ञानदानाचे काम सुरु आहे. पाचवीला गरिबी पुजलेल्या या वस्तीतील लेकरांना ज्ञानमंदिरात पाय ठेवण्यासाठी सुरुवातीच्या काळात पायपीट करत – करत गावातील थोरल्या शाळेत जावं लागायचं. त्यामुळं या वस्तीवरील लेकरं शाळेत जात नव्हती. अनेकांनी शाळेला रामराम ठोकला. त्यातूनच सिध्दार्थनगरमध्ये शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. ९ ऑगस्ट १९९४ रोजी या शाळेची स्थापना झाली.

जून महिन्यात शाळा सुरु झाली मात्र शिक्षक येण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला. स्वर्गीय काशीनाथ सिदनकर गुरुजींच्या रुपाने शाळेला पहिले शिक्षक मिळाले. सहा मुलांना घेऊन शाळेचा श्रीगणेशा झाला. दिवसेंदिवस शाळेच्या पटसंख्येत वाढ होत असून आज शाळेची पट संख्या ८२ आहे.

सामाजिक कार्यकर्ते जालिंदर घोडके, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष मिस्टर शेलार, बाबासाहेब भोस, गटशिक्षणाधिकारी नवनाथ खेनट यांचे योगदान नक्कीत मोलाचे आहे. आज मोठ्या दिमाखात आणि आत्मविश्वासाने उभ्या असलेल्या या शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेचे विद्यार्थ्यांच्या बाबतीतील वैशिष्ट्य म्हणजे येथे नेहमी मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिकची आहे. माध्यमिक विद्यालय अथवा महाविद्यालयात सिध्दार्थनगर शाळेतील माजी विद्यार्थी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत सातत्याने चमकलेली पाहावयास मिळतात.

बालककेंद्री व बालकस्नेही वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे . प्राणायाम – योगासने व कवायतीसारखे उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक सहली, वनभोजन, क्षेत्रभेटी यातून मुलांमध्ये शाळेविषयी आस्था निर्माण केली. वृक्षारोपण, कागदकाम, मातीकाम, वक्तृव, संगीत, वादन, नृत्य व गायनाचे माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला जातो. सोनू मोनू बँक उपक्रमातून व्यवहारज्ञान व बचतीचे उपक्रमातून मुलांमध्ये व्यवहारज्ञान व बचतीचे मूल्य रुजविण्याचे काम शाळेतून होत आहे. सुसज्ज ग्रंथालयामुळे बालकांचे मन, मनगट आणि मस्तक सुपीक करण्यास मदत होत आहे.

मुले संगणकाशी गट्टी करतात. त्यातून संगणकाविषयीची भीती कमी झाली. संगणक, लेझीम, डंबेल्स, ध्वनिक्षेपक, बालमासिके असे खूप मोठे खेळ व अभ्यासपूरक साहित्य लोक सहभागातून उभे राहिले आहे. नगराध्यक्ष भागचंद घोडके, दीपक दिनकर घोडके, गौतम घोडके, राजाराम घोडके, नंदकुमार ससाणे, गणेश घोडके यांचे सातत्याने सहकार्य मिळते.

शाळेला लाभलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परिस्थितीशी सामना करत शाळेच्या विकासाची वीट रचली. प्रामुख्याने सुनंदा तिखे, जिजाबाई लबडे, अनित समुद्र, सविता बोरुडे, शोभा जवक यांनी शाळेसाठी परिश्रम घेतले. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले. आज वाचन प्रकल्प, मेहंदी काढणे, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, इंग्रजी वाचन स्पर्धा असे विविध उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात. केंद्रप्रमुख गजानन ढवळे, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, सुरेश ढवळे, ज्ञानेश्वर कलगुंडे, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, अनिल शिंदे यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. प्रशासन पालक यांची भरीव मदत होत आहे . तसेच सहशिक्षिका मंगल जाचक शारदा शेळके राबवित असलेल्या विविध उपक्रमांमुळे सिध्दार्थनगरची शाळा आदर्श म्हणून पुढे येत आहे.

शब्दांकन : सुजीत गायकवाड, एस.९ प्रतिनिधी चंदन घोडके, बहुजनपत्र प्रतिनिधी.

सर्वप्रथम पालकांना पाल्यांच्या विकासाबाबत आत्मविश्वास दिला. त्यामुळे लोकसहभाग मिळाला. त्यामुळे शाळेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. पालक व विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आत्मीयता वाटू लागली असून परिणामी विद्यार्थीसंख्येत वाढ झाली. आगामी काळात संगणक कक्ष उभारून शाळा पुर्णपणे लोकसहभागातून डिजिटल करण्याचा मानस आहे. संदीप मोटे, मुख्याध्यापक.

प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading