श्रीगोंद्यातील कुस्ती मैदानात सिकंदर शेख, शिवराज राक्षेनीं मारली बाजी.. महिला गटात भाग्यश्री व धनश्री फंड.. तर, बाल गटात निखील माने विजेता.. विदेशी मल्ल देवा थापाच्या रोमहर्षक कुस्तीची सर्वत्र चर्चा.. राजकिय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित..!

दिनांक २७ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्याचे आकर्षण ठरलेल्या कुस्ती मैदानात काल आयोजित स्पर्धेत रोमहर्षक लढती पाहण्यास मिळाल्या.. श्री. अप्पासाहेब सोनवणे आणि नानासाहेब कोथंबीरे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती सामन्यात सिकंदर शेख याने ७,७७,७७७/-,  शिवराज राक्षे याने ७,७७,७७७/-, किरण भगत आणि माउली जमदाडे यांची कुस्ती समान सोडत झाली त्यांना ५,५५,५५५/- तर, पृथ्वीराज पाटिल यांना ३,५१,०००/-,  बाला रफिक शेख यांना ३,०,१०००/- , देवा थापा यांनी २,५१,०००/- चे बक्षीस पटकावले.. त्याच बरोबर बाल गटात निखिल माने याने ३१,०००/- व महिला गटात भाग्यश्री फंडने १,५१,०००/- आणि धनश्री फंड हि  ३१,०००/- च्या बक्षिसांचे मानकरी ठरले. या सर्वांनी प्रतिस्पर्धकांसोबत केलेल्या लढतीत विजय संपादित केला आहे.

नामांकित पैलवानांची कुस्ती लावताना नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, आयोजक आणि पंच

या कार्यक्रमात डॉ.सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, विकी पाचपुते, प्रताप पाचपुते, बाबासाहेब भोस, राहुल जगताप, बाळासाहेब नाहटा, घनःश्याम शेलार, राजेंद्र म्हस्के, प्रशांत गोरे, बापुशेठ गोरे, सुनील वाळकेंसह सर्व नगरसेवक, सामाजिक, राजकीय, कार्यकर्ते, पदाधिकारी व प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. 

पैलवान सिकंदर शेख याने पै.गणी सोबत मारलेली कुस्ती आणि लोकांचा जल्लोष..

यावेळी डॉ.सुजय विखे पाटील यांनी आयोजक आप्पासाहेब सोनावणे व नानासाहेब कोथंबीरे यांचे अभिनंदन केले. तसेच, आप्पा सोनवणे यांनी श्रीगोंदा तालुक्यांत चालू केलेल्या तालमीचे विशेष कौतुक केले. आप्पासाहेब आणि नानासाहेब यांनी तालीम आणि कुस्ती मैदानाच्या माध्यमांतून तरुणांना स्फूर्ती देणारा उपक्रम चालु केला असुन, त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. तर, विजेत्या स्पर्धकांचे डॉ. विखे यांनी अभिनंदन केले आहे.

मैदानात डॉ. सुजय विखे आणि विक्रम पाचपुते यांना मिरवताना पदाधिकारी..

या स्पर्धेत आमदार राम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की, मीही कुस्ती खेळतो.. माझ्या अंगावर आलेला पैलवान चितपट करण्याचे ज्ञान माला आहे. यावेळी आ.शिंदे यांनी नमूद सामन्याच्या आयोजक/संयोजकांसह विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या ठिकाणी तान्हाजी जाधव, पप्पू जाशुद यांनीही पैलवानांना शुभेच्छा दिल्या व सोनावणे, कोथंबीरेसह विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले..

स्त्रोत:(पै. नितिन नाना सोनवणे)

विदेशी पैलवान देवा थापा विजयी झाल्यावर नगरसेवक बापू शेठ गोरे , महावीर पटवा.. सह पदाधिकारी…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading