दिनांक २९ मार्च (कोसेगव्हान,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण मध्ये करोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कोसेगव्हाण ग्रामपंचायतने जंतुनाशक फवारणी चा उपक्रम हाती घेतला.यावेळी,सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्सची फवारणी करण्यात आली आहे. संपूर्ण गावात छोट्या ट्रॅक्टर च्या सहाय्याने फवारणी करण्यात आली.यामुळे कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यास काही अंशी फायदा होनार आहे. सर्वांनी गर्दी न करता आपल्या घरातच रहावे अशा सूचना ग्रामपंचायत मार्फत देण्यात आल्या आहेत.
फवारणी करत असताना कोसेगव्हाणचे माजी उपसरपंच चेअरमन भिमराव बापूराव नलगे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .
(छायाचित्र:महेश गौतम नलगे,कोसेगव्हाण)
