दिनांक ७ मार्च २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व मागण्यांना मान्यता दिली. या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे तालुका प्रभारी नितीन जावळे, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान शिंदे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, बहुजन समाज पार्टीचे तालुका पदाधिकारी अंबादास घोडके आणि शहराध्यक्ष भीमराव घोडके यांनी सक्रीय सहभाग घेतला.

या आंदोलनात पाळण्यांचे दर ठरवणे, सुरक्षेच्या उपाययोजना, अवैध धंदे बंद करणे, आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय तपासणी, ॲम्ब्युलन्स व फायर ब्रिगेड उपलब्ध करणे आणि वेळेचे निर्बंध पाळणे या विषयांवर चर्चा झाली. श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे, निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव, श्रीगोंदा नगरपालिकेचे कर्मचारी बोरुडे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर निकम, तसेच पोलीस कर्मचारी सचिन गोरे आणि संदीप आजबे यांनी आंदोलकांच्या मागण्यांचा आढावा घेतला.

- पाळण्याचे दर निश्चित: लहान पाळण्यांचे तिकीट ₹३० आणि मोठ्या पाळण्यांचे ₹४० असावे.
- दरपत्रक अनिवार्य: प्रत्येक पाळण्यावर दरपत्रक लावणे बंधनकारक.
- सुरक्षा उपाययोजना:
- पाळना चालकाची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालयातून होणार.
- स्ट्रक्चर ऑडिटसाठी नगर येथून टीम रवाना.
- पाळना ग्राउंडमध्ये दोन इमर्जन्सी एक्झिट बंधनकारक.
- अवैध धंद्यांवर कारवाई:
- पेट्रोल पंपाजवळील पाळणे हटवण्याची प्रक्रिया.
- ओपन स्पेस आणि रस्त्यांवरील ३५ भूखंडधारकांना परवानगीशिवाय पाळणे उभारल्याने नोटीस.
- श्रीगोंदा पोलीस प्रशासनाचे आवाहन:
- संत शेख मोहम्मद बाबा यात्रेत कुठेही अवैध व्यवसाय आढळल्यास ०२४८७/२२२३३३ किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन.

हे आंदोलन यशस्वी झाल्याने नितीन जावळे, अंबादास घोडके, अमर घोडके, भीमराव घोडके, सत्यवान शिंदे, नंदू भाऊ ससाने यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच वामन भदे, माऊली वाडगे, मुकुंद सोनटक्के, सावता हिरवे, सौ. प्रतिभाताई धस, सौ. वैशाली भदे, धनंजय लोखंडे, निवृत्ती भैलुमे, दस्तगीर इनामदार, डॉ. राजेंद्र डाळिंबे, विजय शेंडे, नंदकुमार ससाने, ॲड. प्रतिपराजे खामगळ, उमेश मखरे, बापू माने, बाळासाहेब दुतारे, सुनिल ओहोळ, सुरेश देशमुख, संभाजी घोडके, दिपक घोडके, भगवान आबा गोरखे, संदीप उमाप, रमेश मखरे,आतिक कुरेशी यांच्यासह अनेक नागरिक आणि भाविकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
स्रोत:(आमरण उपोषण)


Advertise..
