श्रीगोंदा: मागास प्रवर्गातील अल्पवयीन मुलाचा तीन महिन्यांपासून शारीरिक/मानसिक छळ; गुन्हा दडपण्याचा प्रयत्न..?

दिनांक ९ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यात.. श्रीगोंदा/नगर रोड लगतच्या एका गावात अल्पवयीन असलेल्या मगासवर्गीय समाजाच्या मुलावर सातत्याने शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. वर्गातील एका मुलीसोबत संवाद साधल्याच्या संशयावरून मुलीच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्या मुलाला मागील तीन महिन्यांपासून छळण्यास सुरुवात केली.

या मुलाला वेळोवेळी गावा शेजारील जंगलात नेले जाऊन लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर, “तू हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुला चाकूने ठार करू” असे सांगून त्याला धमकावण्यात आले. या प्रकरणामुळे पीडित मुलाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य गंभीर स्वरूपात बाधित झाले.

काही दिवसांपूर्वी पुन्हा एका प्रसंगी पीडित मुलाला घरातून उचलून जंगलात नेले जात असताना त्याच्या नातेवाईकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत पीडित मुलाची सुटका केली. या घटनेमुळे संपूर्ण प्रकार सार्वजनिक झाला. तर त्या आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड करून पीडित मुलाची मानहानी केली.

पीडित मुलासह त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक व समाजातील काही पुढारी आणि पांढरपेशी गटांनी प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनिही प्रकरण गांभीर्याने हाताळावे अशा सूचना होत आहेत.

घटनेची माहिती काही सामाजिक संघटना चाइल्ड लाइन अधिकाऱ्यांना देणारं आहेत. समाजातील अनेक लोकांनी पीडित कुटुंबाला पाठिंबा दर्शवित “पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केली आहे.

पीडित कुटुंबाला गुन्हा नोंदवण्यापासून परावृत्त करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नेत्यांकडून या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे.

या प्रकारामुळे तालुक्यातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी., प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन कारवाई करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading