दिनांक ८ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:
नगर सायक्लाथाॅन प्रमो सायकल राईड इव्हेंटच्या सांगता समारंभात काष्टी येथे अग्नीपंख फौंडेशनच्या प्रेरणा सायकल वारीसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. याच कार्यक्रमात शिवशंभु सायकल असोसिएशनच्या अष्टविनायक राईडचे मेडल वितरण सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला.

सन २०२४ च्या विशेष टी-शर्टच्या दर्शनी भागावर भारताचे महान उद्योजक रतन टाटा यांचा फोटो पाहून श्रीगोंदा, काष्टी, दौंड, मांडवगण इनामगाव येथील सायकलपटूंनी समाधान व्यक्त केले. या टी-शर्ट निर्मितीसाठी एच. यू. गुगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या अनावरण सोहळ्याला नगर सायक्लाथाॅनचे गौरव फिरोदिया, अमोल कुलकर्णी, मेहेर तिवारी, केतन बलदोटा, तसेच नगरसेवक शहाजी खेतमाळीस, श्रीगोंदा सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर, तसेच मिठू लंके, रमेश एन. टी. शेलार, सांळुके, संजय पठारे, भाऊसाहेब वाघ आणि ऋद्र गांजुरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते टी-शर्ट अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमात गौरव फिरोदिया यांनी अग्नीपंख फौंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “अग्नीपंख श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी आणि आदर्श मंदीरी उपक्रम हा अतिशय सुंदर प्रयत्न आहे. भविष्यात नगर सायक्लिंग असोसिएशन यासाठी शक्य ती मदत करेल.”

शिवशंभु सायकल असोसिएशनच्या वतीने आयोजित अष्टविनायक राईड यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंना मेडल प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात सहभागी सायकलपटूंनी कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपाला शिवशंभु सायकल असोसिएशनच्या अध्यक्षा विजया लंके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि यशस्वी उपक्रमांसाठी सर्व सहभागींच्या सहकार्याचा गौरव केला.

सायकलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रेरणा मिळत आहे. अग्नीपंख फौंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कार्यामुळे श्रीगोंदा व परिसरात सायकलिंग चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
