दिनांक १३ जुलै २०२५ श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना अटक करत मोठे यश मिळवले आहे. अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी करण नाना पवार आणि हत्या, जीवघेणा हल्ला तसेच इतर गुन्ह्यांत फरार असलेल्या लक्ष्मण शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात, श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब), २२ अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपी करण नाना पवार (रा. महांडुळवाडी, ता. श्रीगोंदा) याने तब्बल आठ महिने फरार राहून पोलिसांना चकवा दिला होता. मा. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीस श्रीगोंदा परिसरातून ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास सपोनि गणेश अहिरे हे करत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात, ४ जून २०२४ रोजी काष्टी येथील लोकसेवा हॉटेलजवळ झालेल्या हत्येच्या प्रयत्न प्रकरणी भादंवि कलम ३०७, ३२६, १२०(ब) व आर्म अॅक्ट ४/२५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील सूत्रधार आरोपी लक्ष्मण शिंदे (वय २५, रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे) यासही पोलिसांनी काल लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली. तोही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

लक्ष्मण शिंदेवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात खालीलप्रमाणे गुन्ह्यांचा समावेश आहे:

1. श्रीगोंदा पो.स्टे (कलम ३५४, ३५४(ड), ३२३, ५०४, ५०६..)
2. शिरूर पो.स्टे (कलम ३२४, ३४१..)
3. रांजणगाव पो.स्टे (कलम ३०२, ३६३, ३६५, ३६४,२०१…)
4. खेड पो.स्टे (कलम ३७९, ५११, ३४…)
5. श्रीगोंदा पो.स्टे (कलम ३०७, ३२६, १२०(ब), आर्म अॅक्ट ४/२५…)
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. गणेश उगले आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे मा. पो.नि. श्री किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश अहिरे, पोना संग्राम जाधव, पोकाँ संदीप शिरसाठ, पोकाँ संदीप राऊत, पोकाँ अरुण पवार व सायबर सेलचे पोकाँ राहुल गुंडु आणि नितीन शिंदे यांनी ही कामगिरी पार पाडली.
गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि गणेश अहिरे करत आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
