दिनांक १४ मार्च २०२५, श्रीगोंदा –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंद्यात विजय चौक झेंडा येथे भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विजय चौक झेंडा शिवजयंती उत्सव समिती २०२५ तर्फे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून, सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. हा पूजन सोहळा माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व बापूशेठ गोरे, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. हा कार्यक्रम विजय चौक झेंडा येथे होणार आहे.

सायंकाळी ५ वाजता बाजार वेस येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची संवाद्य मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक शशिकांत शिंदे यांच्या साईप्रसाद रथातून काढण्यात येईल. मिरवणुकीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल –
✔ बाजार वेस → विजय चौक झेंडा → रोहिदास चौक → छत्रपती शिवाजी चौक → शनी चौक..
शनी चौक येथे या मिरवणुकीची सांगता होईल.

या मिरवणुकीत राज्यातील नामांकित चार बँड पथकांचा सहभाग असणार आहे. त्यामध्ये –
- मास्टर शेख (नाशिक)
- शफिक भाई सय्यद (पाटोदा)
- शकील भाई, अमर बँड (बारामती)
- वसीम बाबुलाल भाई (विंचूर)

या शिवजयंती उत्सवाची ४३ वर्षांची अखंड परंपरा आहे. ही परंपरा याही वर्षी मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येणार आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. विजय चौक झेंडा शिवजयंती उत्सव समिती आणि स्थानिक तरुण मंडळ या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेत आहेत.

या संपूर्ण नियोजनात नंदुकुमार ताडे (तालुकाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट), अनिल नन्नवरे (मास्टर), बाळू ताडे, सचिन नन्नवरे, संजय नन्नवरे, लखन नन्नवरे, काळूराम ताडे, नंदू चव्हाण, बाळू भागवत, अतुल बगाडे, सह विजय चौक झेंडा शिवजयंती उत्सव समिती २०२५ चे पदाधिकारी सक्रिय आहेत.
शिवप्रेमी आणि श्रीगोंदा वासीयांसाठी हा सोहळा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. विजय चौक झेंडा येथे होणाऱ्या या जल्लोषमय शिवजयंती उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
