कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या श्रीगोंद्याच्या जवानाची मृत्यूशी झुंज अपयशी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:

ड्युटीवर असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले पोलीस जवान राहुल सुनील मोटे पाटील (वय ३८) यांचे दोन वर्षांच्या प्रदीर्घ उपचारानंतर दुर्दैवी निधन झाले. पुणे येथे कर्तव्यावर असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा पसरली असून, एका कर्तव्यदक्ष जवानाला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.

दिवंगत राहुल मोटे पाटील यांच्या पार्थिवावर आज, बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता श्रीगोंदा येथील मोटे पाटील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पोलीस दलातील अधिकारी, सहकारी, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी साश्रू नयनांनी या वीर जवानाला अखेरची श्रद्धांजली वाहिली.

अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि कामाप्रती निष्ठा यामुळे राहुल मोटे पोलीस दलात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading