लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे यांचे श्रीगोंद्यात उत्साहात स्वागत..

दिनांक १५ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. कैलासदादा खंदारे यांच्या श्रीगोंदा दौऱ्यानिमित्त तालुका व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. हा दौरा १ मार्च रोजी पुणे येथे होणाऱ्या लहुजी शक्ती सेनेच्या महाअधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आला होता.

या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, संजय वाल्हेकर, युवक जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब रोकडे, जिल्हा महासचिव किरण उमाप, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे, युवक तालुकाध्यक्ष रामभाऊ मोरे, विधानसभा अध्यक्ष संदीप अवचिते, श्रीगोंदा शहराध्यक्ष हर्ष आढागळे यांच्यासह वसंत अवचिते, गणेश लोंढे, प्रवीणकुमार शेंडगे, दादाभाऊ सकट, मोहन सकट, बाबासाहेब बुलाखे, संतोष शेंडगे आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

महाअधिवेशनाच्या आयोजनासाठीच्या तयारी आणि नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कैलासदादांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अधिवेशन यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी संघटनेच्या भविष्यातील कार्ययोजनांवरही चर्चा करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.

यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार मा. विक्रम पाचपुते यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्यांनीही महाअधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading