दिनांक १५ जून, बार्शी:
निस्वार्थी वूत्तीने जनहितार्थ सामाजीक काम केल्यास यश नीश्चीत मीळते.असे बार्शी नगरपालीकेचे नगराध्यक्ष आसीफ भाई तांबोळी यांनी नगरसभा आंदोलन अध्यक्ष राजेश डांगे यांच्याशी बोलताना सांगीतले.
गा्मपंचायत हद्दीमध्ये गा्मसभा होते.त्या धर्तीवर नगरपालीका क्षेत्रात जनजागूती करताना राजेश डांगे यांनी बार्शी नगरपालीकेचे नगराध्यक्ष आसीफभाई तांबोळी यांची भेट घेवून,नगरसभा (वार्ड सभा) होण्यासाठी चळवळीला पांठींबा देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
आसीफ भाई यांनी वार्ड सभा प्रभावी होण्यासाठी पाठपुरवठा करण्याचे तसेच विविध विकासकामामध्ये नागरीकाच्या सहभागासाठी प्रयत्न करण्याचे सुचवतानाच बार्शी नगरपालीकेने केलेल्या कामकाजांची माहीती देत त्या ईतरत्र राबवण्याठी मार्गदर्शन करण्याचे मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दीले.सामाजीक कार्यात जनहीतार्थ काम केल्यास, जनता पाठीशी उभी राहते.कोणतेही काम करण्यासाठी पाठपुरवठा व ईच्छा शक्ती महत्वाची असल्याचे सांगत तांबोळी यांनी नगरसभा आंदोलनाच्या चळवळीला पाठींबा देण्याचे मान्य केले.
