मढेवडगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश.

दिनांक २८ एप्रिल(मढेवडगाव,श्रीगोंदा):

राज्यस्तरीय मंथन पब्लिकेशन प्रज्ञाशोध परीक्षेत मढेवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळविले आहे.शाळेतील १ ली ते ४ थी वर्गातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा,यासाठी मोठ्या संख्येने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सहभाग घेतला होता. शाळेतील एकूण ३८ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते.इयत्ता दुसरी मधील सोहम अजितकुमार शिर्के १४६ गुणांसाह राज्यात दुसरा तर,आरोही दत्तात्रय शितोळे १४० गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे.चौथीतील उवेज अमजद तांबोळी २७० गुण मिळवून केंद्र पातळीवर सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच कल्याणी गाढवे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य व गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

या विद्यार्थ्यांना शिक्षक सय्यद जावेद , मुख्याधिपिका कांबळे संगीता, ढवळे सुनीता , बारस्कर सुवर्णा व खिळे सीमा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.मा गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, विस्तार अधिकारी कलगुंडे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

आरोही दत्तात्रय शोरोळे
आरोही दत्तात्रय शोरोळे
सोहम अजित शिर्के

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading