दिनांक १८ मार्च,श्रीगोंदा:
देऊळगाव भानगाव शिव रस्त्याच्या कामासाठी संतोषभाऊ पवार (प्रहार प्रवक्ते महाराष्ट राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी व देऊळगाव येथील (प्रहारचे मीडिया तालुका अध्यक्ष) संतोष गायकवाड यांनी वेळोवेळी आंदोलने व पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर प्रहारचे मंत्री बच्चू कडू यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांना फोन केला व कामासाठी दखल घेण्यास सांगितले यानंतर लगेचच तहसीलदार साहेबांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली व स्वतः दोन दिवस उभे राहून काम पूर्ण करून दिले आहे.

याकामी संतोष पवार (प्रवक्ते प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य) विनोद भाऊ परदेशी (जिल्हाध्यक्ष), नयन भाऊ पुजारी (रुग्णसेवक महाराष्ट्र राज्य, पुणे), अनिकेत कदम (रुग्णसेवक, पुणे), अमोल मानकर (रुग्णसेवक, पुणे), अजितभाऊ धस (कार्याध्यक्ष, अहमदनगर), प्रकाशभाऊ बेरड (जिल्हा सचिव अहमदनगर), इंद्रजीत काळे (युवा जिल्हाध्यक्ष अहमदनगर), कृष्णा भाऊ खामकर (तालुका अध्यक्ष, श्रीगोंदा), माधवभाऊ बनसुडे (शहर अध्यक्ष, श्रीगोंदा), रसिक काका गुंदेचा (समाजसेवक), बाळासाहेब गुंदेचा (युवा नेते), नंदकिशोर कांबळे (युवा उद्योजक), अमोल कांबळे (युवा उद्योजक), अशोक शेठ नवले (युवा सरपंच भानगाव) तसेच असंख्य शेतकरी व प्रहार चे पदाधिकारी यांचा सहयोग लाभला.
स्रोत:(माधव बनसुडे, प्रहार,श्रीगोंदा)
