दिनांक ११ जानेवारी, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्यांच्या प्रश्नांमध्ये अग्रणी भाग घेणारे, अतिक भाई कुरेशी (जिल्हाध्यक्ष) ऑल इंडिया जमियतुल कुरेश एक्शन कमिटी, अहमदनगर यांनी श्रीगोंदा तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पदी फरान बेपारी यांची निवड करण्यात आली आहे.

नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनिकेत धोत्रे, गणेश संठे, बंटी उबाळे, प्रज्वल कोथिंबिरे, रुक्षी पवार, रमा चव्हाण, रोहित ननवरे, सुरज मते, पप्पू नदाफ, इशुफ नदाफ, सलमान पठाण, फरदीन शेख, जीशान जकाते, रेहान शेख, तोयब तांबोळी, आसिफ पठाण, शोएब शेख, शाहरुख इनामदार, शाहरुख कुरेशी,आजम कुरेशी, अर्शद कुरेशी, आहेमद कुरेशी, बाबू कुरेशी, मुजाहिद कुरेशी, जैद कुरेशी, शाहिद कुरेशी, फैजान बेपारी, आयास बेपारी, आसिफ बेपारी, सलमान बेपारी तसेच रिहान बेपारी सह कार्यकर्त्यांचा नियुक्तीमध्ये समावेश आहे.

ऑल इंडिया जमियतुल कुरेश एक्शन कमिटीचे जिल्हाध्यक्ष अतिकभाई कुरेशी यांनी नमूद नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सुपूर्त करत, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. याच बरोबर कुरेशी यांनी संघटनेचे ध्येय/धोरणं व संघटनेच्या सामाजिक कामाबाबत माहिती दिली आहे. Taluka executive of All India Jamiatul Qureshi Action Committee announced.
स्रोत: (प्रसिद्धी पत्र)
